सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. पण रोहित शेट्टीचा हा पहिला चित्रपट नाही, याआधीही त्याच्या ९ चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे, जाणून घेऊया चित्रपटांबद्दल...
‘सिंघम अगेन’ पूर्वी रोहित शेट्टीच्या ‘या’ चित्रपटांनी केला १०० कोटींचा टप्पा पार
'सिंघम अगेन'मध्ये दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याने रोहित शेट्टीचे मानले आभार; म्हणाला, "वंडरफूल चित्रपटाचा आणि ड्रीम टीमचा भाग..."
नऊव्या क्रमांकावर अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह स्टारर ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. या चित्रपटाने २९४ कोटींची कमाई केलेली आहे.
रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगण स्टारर ‘गोलमाल अगेन’ चित्रपटानेही ३१० कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.
शाहरुख खान आणि काजोल देवगण स्टारर ‘दिलवाले’ चित्रपटाने ३७६ कोटींची कमाई केलेली आहे.
अजय देवगण स्टारर ‘सिंघम रिटर्न्स’ चित्रपटानेही २६२ कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाने ४२४ कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.
अजय देवगण आणि अभिषेक बच्चन स्टारर ‘बोल बच्चन’ चित्रपटाने १६५ कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगणच्या ‘सिंघम’ ह्या सुपरहिट चित्रपटानेही १५७ कोटींची कमाई केली आहे.
अजय देवगण आणि करीना कपूर खान स्टारर ‘गोलमाल ३’ चित्रपटाने १६७ कोटींची जबरदस्त कमाई केली आहे.