"दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं..." Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया
दोन महिन्यांपूर्वीच २२ वर्षांचा संसार मोडलेल्या टिव्ही अभिनेत्री शुभांगी अत्रेवर काही दिवसांपूर्वीच दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या एक्स पतीचं निधन १८ एप्रिल रोजी झालं. तिच्या पतीचं नाव पियुष पुरे असं असूीन त्याचं निधन यकृताशी संबंधित आजारामुळे झाले. पतीच्या निधनानंतर तिच्यावर होणाऱ्या टीकेवर अभिनेत्रीने भाष्य केले आहे. तिने ई-टाईम्सला मुलाखती दिली.
“हे TRP वाढवण्याचं साधन नाही…”; पहलगाम हल्ल्यावरून अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रसारमाध्यमांवर संतापली
मुलाखतीत शुभांगी अत्रेने सांगितले की, “जेव्हा पियुष हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, त्यावेळी मी त्याच्यासोबत बोलले होते. त्याचं आणि माझं बोलणं १६ एप्रिललाच झालं होतं. मी तो बरा व्हावा, अशी देवाकडे प्रार्थना सुद्धा केली होती. पण त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून मी भावुक आणि सुन्न झाले. मला फक्त पियुषच्या सर्व चांगल्याच आठवणी मनात साठवून ठेवायच्या आहेत. मी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लवकरच इंदौरला जाणार आहे. माझी मुलगी सध्या अमेरिकेत आहे. ती अमेरिकेतून भारतात आल्यानंतर आम्ही दोघीही तिकडे जाऊ. तिची परिक्षा असल्यामुळे ती परदेशात आहे, त्यानंतर ती भारतात येईल.”
पियुषच्या निधनानंतर नेटकरी त्यांच्या घटस्फोटामुळे शुभांगीवर जोरदार टीका करत आहेत. टीकेबद्दल शुभांगी म्हणाली की, “संपूर्ण गोष्टीची माहिती नसताना लोकांबद्दल मतं तयार करून बोलणं सोपं आहे. मी यशस्वी झाल्याने त्याला सोडलं असं लोकांना वाटतं; पण ते अजिबात खरं नाही. अनेक वर्ष आमच्या नात्यात झालेल्या घुसमटीनंतर मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मी त्याला सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्याचं दारूचं व्यसन… दारुमुळे आमच्या दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात फार परिणाम झाला. मी माझं लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण, अनेक गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या होत्या. आमच्या दोन्ही कुटुंबांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या व्यसनाने त्याला संपवलं. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं. पण, त्याचाही काही उपयोग झाला नाही. या सगळ्याचा माझ्या मुलीवरही परिणाम होत होता. तिने माझ्यापेक्षा जास्त त्रास सहन केलाय.”, असंही ती म्हणाली.