Bollywood Actress Moushumi Chatterjee Prays To God For Her Daughter Death Know Reason
७० च्या दशकातील सुप्रसिद्ध हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी ‘रोटी कपडा और मकान’, ‘अनारी’, ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ आणि ‘प्यासा सावन’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मौसमी कायमच आपल्या फिल्मी करियरसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिल्या आहेत. मौसमी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
मौसमी चॅटर्जी यांचा जन्म २६ एप्रिल १९७६ रोजी झाला असून त्या उद्या आपला ७७ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. मौसमी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा पाहुया. मौसमी यांच्या जावयाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्या लेकीला शेवटचं बघायला देखील आल्या नव्हत्या. त्याचबरोबर मौसमी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलेलं की, त्या मुलीच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करत होत्या. मौसमी यांची मुलगी पायल हिच्या मृत्यूनंतर, मौसमी यांची बराच वेळ वाट पाहण्यात आली. पण त्या आल्याच नव्हत्या, त्यांच्या अनुपस्थितीत मुलीचे अंतिम संस्कार करण्यात आले, असं म्हटलं जातं. मौसमी चॅटर्जी यांनी ‘लहारेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, एके काळी त्यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करायच्या.
मौसमी चॅटर्जी यांनी दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत सांगितलं की, तिने (पायलने) आयुष्यात एक फार मोठी घोडचूक केली होती, ज्याचे परिणाम तिला आयुष्यभर भोगावे लागले होते. त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागला. २०१७ मध्ये माझी मुलगी कोमात गेली होती. ती वेळोवेळी कोमातून बाहेर येत राहिली. पण आम्हाला तिला कोणत्याही अटीशिवाय भेटण्याची परवानगी नव्हती. आम्हाला पोलिस आणि न्यायालयामध्ये जावं लागलेलं. मलाही देवाला तिला घेऊन जाण्यासाठी प्रार्थना करावी लागली. मी तिला वेदनेत पाहू शकत नव्हते. आपल्याला एक दिवस आपलं शरीर सोडावंच लागेल, मग वेदना सहन करण्याचा काय अर्थ आहे? जर तुमचं तुमच्या आत्म्यावर प्रेम असेल तर तुम्ही म्हणाल की मला जाऊ द्या.’ असं मौसमी यांनी सांगितलेलं.
मौसमी चॅटर्जीची मोठी मुलगी पायलचं लग्न उद्योगपती डिकी सिन्हाशी झाले होते. मौसमी चॅटर्जी आणि डिकीचे कुटुंब हे व्यवसाय भागीदार होते. काही काळानंतर, व्यवसायातील मतभेदांमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर निर्माण झाले. यावेळी मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल कोमात गेली. २०१८ मध्ये, लेक पायल हिच्या उपचारादरम्यान, मौसमी चॅटर्जीने तिच्या जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली की तो तिची काळजी घेत नाही किंवा तिच्या उपचाराचा खर्चही देत नाही. मौसमीच्या आरोपांना उत्तर म्हणून, डिकी सिन्हाने तिच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आणि तो खटला जिंकला. तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमधील भांडणे इतकी वाढली की ३० महिने कोमात राहिल्यानंतर २०१९ मध्ये पायलचा मृत्यू झाला तेव्हा मौसमी तिला शेवटचे भेटायलाही गेली नाही. याबद्दल, डिकी म्हणाली होती की सर्वजण तिच्या येण्याची वाट पाहत होते, परंतु ती आली नाही, जरी तिची मुलगी आणि पती अंत्यसंस्काराला उपस्थित होते.