फोटो सौजन्य: X.com
बिग बॉसचा 16 वा सिझन किती गाजला, हे आपण सर्वच जाणतो. या सिझनमध्ये असणाऱ्या प्रत्येक कन्टेस्टंटने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. यातीलच एका कन्टेस्टंटचे नाव म्हणजे अब्दू रोझिक. मात्र, आता अब्दू रोझिकच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अब्दू रोझिकला दुबई विमानतळावर चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या चोरीच्या आरोपाखाली अब्दूला अटक करण्यात आली आहे ते अद्याप समजले नाही.
‘बिग बॉस’ फेम Abdu Rozik च्या अटकेबाबत टीमने दिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘आमच्याकडे शब्द नाहीत…’
अब्दु शनिवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास मॉन्टेनेग्रो शहरातून दुबईला परतत होता. मात्र, त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अब्दुच्या व्यवस्थापकीय कंपनीने दुबईच्या न्यूज पोर्टल ‘खलीज टाईम्स’ला याबद्दल माहिती दिली आणि त्याच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, त्यांनी त्याच्या निवेदनात अब्दुवरील आरोपांचा उल्लेख केलेला नाही. ते म्हणाले,”सध्या आपण फक्त एवढेच सांगू शकतो की अब्दुला चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.”