फोटो सौजन्य - JIO सिनेमा
बिग बॉस ओटीटी सिझन ३ : बिग बॉस ओटीटी सिझन ३ चा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. हा शोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असते. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामधून अनेक स्पर्धक सुद्धा बाहेर झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरांमधून शिवानी कुमारी आणि विशाल पांडे यांना बाहेर काढण्यात आले होते. विशालच्या एलिमिनेशनमुळे बिग बॉसमधील त्याचे मित्रच नव्हे तर चाहतेही भावूक झाले. आता घरात मोजकेच स्पर्धक उरले आहेत. त्याचबरोबर हा शो सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. दरम्यान, टॉप ५ मध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे.
सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करत आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतांश लोकांनी रणवीर शौरीला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी शहनाज गिलनेही त्याच्यासाठी नवीन कपडे पाठवले होते. त्याच वेळी, YouTubers चे चाहते त्यांच्या आवडत्या लोकांना समर्थन देत आहेत. काहींना नाजी विजेता बनवायचा आहे, तर काहींना ट्रॉफी लवकेश कटारियाकडे जायला हवी असे म्हणणे आहे. असा अंदाज वर्तवला जात होता रणवीर शौरीला फायनलिस्ट बनवण्यात आले आहे. फॅन पेज बिग बॉस खबरीनुसार, टॉप ५ मध्ये पोहोचणारा रणवीर पहिला फायनलिस्ट आहे. मात्र, त्याचे नाव ऐकून काही युजर्स फारसे खूश झाले नाहीत. युजर्सनी लिहिले की, ‘रणवीर टॉप ५ मधील सर्वात अयोग्य स्पर्धक आहे.’ असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
बिग बॉस OTT ३ च्या ग्रँड फिनालेची तारीख २ ऑगस्ट आहे. काल, होस्ट अनिल कपूरने स्पष्ट केले की हा वीकेंड का वारचा शेवटचा आठवडा आहे.