फोटो सौजन्य - सोशल मिडिया (JioHotstar Reality)
आज बिग बॉस 19 दुसरा वीकेंडचा वार होणार आहे. सलमान खान कोणाला खडसावणार त्याचबरोबर कोणाचं कौतुक करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. झालेल्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी धुमाकूळ घातला. फरहाना आणि अभिषेक बजाज यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. मागील आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्याला घराबाहेर काढण्यात आले होते या आठवड्यात पुन्हा पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे. सलमान खानचा नवा एक प्रमुख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये तो आता घरातला सदस्यांना ओरडताना दिसत आहे.
वायरल होत असलेल्या प्रमोमध्ये मध्ये सलमान खान अमाल मलिक ला ओरडताना दिसत आहे. प्रोमो च्या सुरुवातीला सलमान खान खुर्चीवर बसून झोपलेला पाहायला मिळतो आणि यावेळी कोंबडा आरवत असतो. हे पाहून सर्वच घरातले सदस्य हसतात, त्यानंतर सलमान खान अमल मलिकला म्हणतो की आत्तापर्यंत असा कोणताही स्पर्धक आलेले नाही जो दिवसा एवढा वेळ झोपतो. तू इथे कोणत्या हेतूने आला होतास झोपण्यासाठी आला होतास का? तू इथे दाखवायला आला आहेस की अमल मलिक खरा कोण आहे. ते तू दोन आठवडे दाखवून दिलेस का?
Salman bashed Amaal 🙂
Tbh he’s doing great and still way better than the others !
STAY STRONG AMAAL ❤️🔥#AmaalMallik #BiggBoss19
pic.twitter.com/JVVEZ91JG7— 𝑵𝒂𝒉𝒚𝒂𝒏🥀 (@devil_nahyan) September 5, 2025
मागील आठवड्यामध्ये अमाल मलिक हा बऱ्याचदा झोपताना दिसला आहे बराच मुद्द्यांमध्ये त्याचे योगदान दिसले नाही त्यामुळे सलमानने त्याच्यावर भडकणे हे सहाजिकच आहे. या आठवड्यामध्ये अवेज दरबार, अमाल मलिक, कुणीका सदानंद, तान्या मित्तल, मृदुल तिवारी हे सदस्य घरावर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
Bigg Boss 19 : देव पावला…अमाल मलिक झाला जागा! थेट फरहानाशी भिडला, म्हणाला – तू काय बसीरची…
दर सीझनप्रमाणे, यावेळीही दुसऱ्या आठवड्यात नामांकने असतील. घराचे पहिले नामांकन या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या वॉरवर होणार आहे. शोच्या नामांकित स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. कलर्सने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. त्यात ५ बलाढ्य सदस्यांची नावे आहेत. या यादीत अमाल मलिक, कुनिका सदानंद, तान्या मित्तल, मृदुल तिवारीआणि आवाज दरबार यांची नावे आहेत. हे पाचही सदस्य घरात चांगले खेळत आहेत. आता हे पाहावे लागेल की या पाचही जणांपैकी कोणाला जनता वीकेंडच्या वॉरवर घराबाहेर काढते.
हा प्रोमो येताच लोकांनी आपले मत मांडायला सुरुवात केली आहे. बहुतेक वापरकर्त्यांना वाटते की आवाज दरबार शोमधून बाहेर पडू शकतो. कुनिका, मृदुल, तान्या आणि अमल शोमध्ये उघडपणे खेळत आहेत आणि त्यांचा खेळही दिसत आहे. अशा परिस्थितीत आवाज सर्वांसमोर थोडा कमकुवत दिसत आहे. सध्या अंतिम निकालासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.