" 'बिग बॉस' शो स्क्रिप्टेड असतो का ?" घराबाहेर आल्यानंतर आर्याने केला खुलासा
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून सातव्या आठवड्यात वैभव चव्हाण आणि आर्या जाधव घराबाहेर पडले आहे. वैभव चव्हाणला व्होट्स कमी पडल्यामुळे घराबाहेर गेला असून आर्या जाधवने निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे तिला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. आर्या शनिवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती आज पहिल्यांदाच घडलेल्या प्रकारावर इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून बोलली आहे. आज (१६ सप्टेंबर, सोमवार) दुपारी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत घरात घडलेल्या प्रकारवर आपली बाजू मांडली आहे. लाईव्हच्या माध्यमातून आर्याला ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का ? यावर भाष्य केलं आहे.
हे देखील वाचा – अभिनेता सुव्रत जोशीने शेअर केला कॅबमधील अनुभव, फोटो शेअर करत म्हणाला…
आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यानंतर तिने निक्कीची आणि बिग बॉसचीही माफी मागितली. शिवाय, तिने घरातच आपली चूक झाली आहे, अशी सुद्धा कबुली दिली. पण तरीही तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आर्याने इन्स्टावर लाईव्ह येत, चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तरं दिले आहेत. यावेळी आर्याला लाईव्हमध्ये, ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने नाही असं उत्तर दिले आहे. ती म्हणाली, “बिग बॉस स्क्रिप्टेड नसतं. बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धक आम्ही आहोत तसेच वागत होतो. जर हा शो स्क्रिप्टेड असता, तर आम्हाला अभिनय सुद्धा करावा लागला असता ना…”
“हिंसा चुकीचीच आहे पण निक्की जो गेम खेळते तोही घाण आहे. मी तिच्यावर हात कसा उचलला याचा अजूनही विचार करतेय.”, असं लाईव्ह दरम्यान आर्या म्हणाली. गुरूवारी (१२ सप्टेंबर) झालेल्या एपिसोडमध्ये, निक्की आणि आर्यामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान वॉशरूम एरियामध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यांचा हा वाद इतका टोकाला गेला की, आर्याने रागाच्या भरात थेट कानाखालीच दिली. निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणू बाथरूमचा दरवाजा लावून घेतला होता. निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलत निक्की वॉशरुममध्ये आली. मागोमाग जान्हवीसुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली..
हे देखील वाचा – विजय ‘थलापती 69’ साठी घेणार ‘इतकं’ मानधन, किंग खान आणि भाईजानलाही टाकलं मागे
याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले. त्यामुळे भडकलेल्या आर्याने निक्कीच्या थेट कानाशिलातच वाजवली यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती. घटना घडल्यानंतर बिग बॉसच्या समोर आर्या स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाली की, “दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली. तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिचा हात माझ्या डोळ्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं.” दरम्यान, या प्रकरणावरून सोशल मीडियावरून आर्याला चांगलाच पाठिंबा मिळला होता. अनेकांनी तिचे कौतुकही केले.
आर्याला घराबाहेर काढल्यानंतर सोशल मीडियावर निक्कीला, बिग बॉसला आणि रितेश देशमुखलाही ट्रोल केलं जात आहे. आर्याला घराबाहेर काढल्यावर बिग बॉस बघणार नाही, बिग बॉस निक्कीची बाजू घेतात, निक्की व अरबाजचाच हा शो आहे त्यांना जिंकवा असं म्हणत प्रेक्षकांनी बिग बॉसला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर अनेकांनी हा शो बॉयकॉट करणार असल्याचंही म्हटलं होतं.