विजय 'थलापती 69' साठी घेणार 'इतकं' मानधन, किंग खान आणि भाईजानलाही टाकलं मागे
Thalapathy Vijay ‘Thalapathy 69’ Fees : ‘मास्टर’, ‘लिओ’, ‘बीस्ट’ या चित्रपटांमुळे चर्चेत राहिलेला विजय थलापतीचा गेल्या काही दिवसांपूर्वी ‘गोट’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून जगभरात सुद्धा दमदार कमाई करत आहे. विजय थलपतीच्या ‘गोट’ चित्रपटाने भारतात २०० कोटींच्या आसपास कमाई केलेली असून जगभरामध्ये ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. अशातच विजय सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘थलापती 69’ चित्रपटानंतर विजय फिल्मी करियरसोडून राजकारणात एन्ट्री करणार आहे.
खरंतर विजयच्या चाहत्यांमध्ये, त्याचा ‘गोट’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) हा अखेरचा असणार अशी चर्चा होत होती. पण असं झालेलं नाही. विजय थलापतीचा अखेरचा चित्रपट ‘थलापती 69’ असणार आहे. KVN प्रॉडक्शनने विजयच्या शेवटच्या चित्रपटाची घोषणा १३ सप्टेंबरला केली आहे. विजयच्या ह्या शेवटच्या चित्रपटासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याच्या शेवटच्या चित्रपटाच्या फीची जोरदार चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटामध्ये सर्वाधिक मानधन घेणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, थलपती विजय शेवटच्या चित्रपटासाठी २७५ कोटी रुपये मानधन घेणार आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात हे सर्वाधिक मानधन असल्याचे बोलले जात आहे. विजय ‘थलापती 69’साठी जेवढे मानधन घेणार आहे, तितक्या पैशांत सहज २ ते ४ चित्रपट बनले जातील. शाहरुखने आणि सलमानने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘टायगर ३’ साठी सुद्धा एवढं मानधन घेतलं नसेल. त्यापेक्षा जास्त विजय थलापती ‘थलापती 69’साठी मानधन घेणार आहे. शाहरूखने ‘पठाण’मध्ये प्रॉफिट शेअर केलं होतं. चित्रपट हिट झाल्यानंतर अभिनेत्याला २०० कोटी मानधन मिळालं होतं.
हे देखील वाचा- कृष्णा श्रॉफने ‘खतरों के खिलाडी 14’ मध्ये ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत मिळवले स्थान!
‘जवान’ चित्रपट सुद्धा रेड चिलिज एन्टरेटेन्मेंटच्या बॅनरखालीच तयार झाला होता. तर सलमानने ‘टायगर ३’साठी १०० कोटी मानधन घेतलं होतं. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणारा तो कलाकार ठरणार आहे. विजय आता ‘थलापती 69’च्या माध्यमातून पॅन इंडिया स्टार म्हणून ओळखला जाणार आहे. विजयने तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीला अनेक अप्रतिम चित्रपट दिले आहेत. ‘थलपथी 69’ बद्दल बोलायचे तर, चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले आहे. तसेच ‘जवान’, ‘मास्टर’ आणि ‘जेलर’सारख्या चित्रपटांना संगीत देणारे अनिरुद्ध रविचंदर ‘थलापथी 69’ साठीही संगीत देणार आहेत. KVN प्रॉडक्शन हा चित्रपट बनवत आहे. हा त्याचा पहिला तमिळ चित्रपट असणार आहे.
थलापती विजयचा ‘GOAT’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट आता भारतात 200 कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत आहे.