"स्ट्राँग प्लेयरची इमेज मातीत मिळवली...",भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अरबाजवर चांगलाच संतापला
Riteish Deshmukh On Arbaaz Patel: “बिग बॉस मराठी”च्या ५ व्या सीझनची अख्ख्या महाराष्ट्रात कमालीची क्रेझ आहे. यंदाच्या सीझनला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. महिन्याभरात जवळपास सर्वच स्पर्धकांचे अख्ख्या महाराष्ट्राला रंग दिसले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक स्पर्धकांचे रंग बदललेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या आठवड्यातल्या ‘भाऊच्या धक्का’वर रितेश देशमुखने अरबाजची जबरदस्त कान उघडणी केली आहे. “स्ट्राँग प्लेयरची इमेज मातीत मिळवली…” असं म्हणत त्याला अख्ख्या महाराष्ट्रासमोर झापलं आहे.
हे देखील वाचा – सलमान खानच्या बिग बॉस १८ सीझनमध्ये हा कॉमेडियन करणार एंट्री!
‘बिग बॉस मराठी’च्या घराची क्वीन निक्की स्वत:ला मानते. तर या क्वीनच्या चुका कव्हर करणारा अरबाज पटेल आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने घरातील सदस्यांना अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता का? असा प्रश्न विचारला आहे. शिवाय त्याच्या खेळावरूनही त्याला त्याच्या चुका दाखवून दिल्या आहेत. अरबाजने गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात चांगलाच धिंगाणा घातला होता. निक्कीला दूर ठेवा, मला त्रास होतोय असं म्हणत सर्व घराचं लक्ष त्याने स्वत:कडे ओढून घेतलं होतं. त्याचा त्रास पाहून घरातील सर्व सदस्यांनी त्याची मदत केली, त्याच्याबाजूने भांडले. पण गेल्या आठवड्यात ‘भाऊचा धक्का’ झाल्यानंतर एका क्षणात त्याने पलटी मारली. त्यामुळे यासंदर्भात रितेशने अरबाजची शाळा घेतली आहे.
भाऊच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश अरबाजला म्हणतोय, “अरबाज एक ‘स्ट्राँग प्लेअर’ही इमेज तुम्ही जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे.” त्यावर अरबाज म्हणतो,”सर मी केअर करतोय कोणाची तरी”. त्यावर अरबाजला थांबवत रितेश म्हणतो,”तुम्हाला समजत नाही… तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतं.” त्यानंतर घरातील इतर सदस्यांना रितेश प्रश्न विचारतो की,”इथे कोणाला वाटतं अरबाज निक्कीचा डोअरमॅट होऊन पायापुढे येत होता?” या प्रश्नावर घरातल्या सर्वच सदस्यांनी हातवर केला होता. गेल्या आठवड्यापासून निक्की सर्वच स्पर्धकांसोबत उलट सुलट बोलताना दिसली. शिवाय तिलाही आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने शिक्षा दिलीये.
हे देखील वाचा – Bigg Boss Marathi: रितेश देशमुख देणार आज निक्की तांबोळीला धक्का! दिली सर्वात मोठी शिक्षा
या आठवड्यामध्ये पुन्हा निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्या कॅप्टन्सीच्या वेळी तिने बराच त्रास दिला होता. यावेळी तिने अनेक काम करण्यास नकार दिला त्याचबरोबर अनेक स्पर्धकांशी उद्धट वागली होती. याच कृत्यांमुळे रितेश देशमुखने तिची भाऊंच्या धक्क्यावर शाळा घेतली आहे.