फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया
बिग बॉस मराठी : बिग बॉस मराठी सिझन ५ चा कहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. रितेश देशमुखच्या होस्टिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यामध्ये स्पर्धकांनी त्यांच्या अंदाजात मागील काही आठवड्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सूरजला नवा कॅप्टन म्हणून घोषित करण्यात आले होते. आज भाऊचा धक्का होणार आहे, याआधी कित्येक भाऊंच्या धक्क्यावर निक्की तांबोळीची रितेश देशमुखने कानउघाडणी केली आहे. परंतु आता या आठवड्यामध्ये पुन्हा निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्या कॅप्टन्सीच्या वेळी तिने बराच त्रास दिला होता. यावेळी तिने अनेक काम करण्यास नकार दिला त्याचबरोबर अनेक स्पर्धकांशी उद्धट वागली होती. याच कृत्यांमुळे रितेश देशमुखने तिची भाऊंच्या धक्क्यावर शाळा घेतली आहे.
आज म्हणजेच शनिवारच्या भागामध्ये बिग बॉसची स्पर्धक निक्की तांबोळीला रितेश देशमुख भाऊंच्या धक्क्यावर शिक्षा देणार आहे. यावेळी नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यावेळी रितेश देशमुखने निक्कीला तिच्या जागेवरून उठवले आणि म्हणाला की, कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही, मी अशा प्रकारची दादागिरी खपवून घेणार नाही. इथून पुढे संपूर्ण सीझनभर तुम्ही कॅप्टन होणार नाही अशा प्रकारची शिक्षा रितेश देशमुखने दिली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातील दोन ग्रुप पडले होते. मात्र, आता टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की-अरबाज विरुद्ध जान्हवी-वैभव असं समीकरण पाहायला मिळत आहेत. निक्की बिग बॉसच्या घरात काम करत नसल्यामुळे घरातील सर्वच सदस्य तिच्यावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन निक्की आणि जान्हवीचे खटके उडतानाही दिसत आहेत. एकीकडे निक्की घरातील काम करण्यास तयार नसल्याचं दिसत असताना, तर दुसरीकडे बिग बॉसने जान्हवीला आदेश देत तिच्यासाठी चहा बनवण्यास सांगितला. यावरुन नेटकरी चांगलेच संतापले आहे.