
'कोकण हार्टेड गर्ल'चा 'बिग बॉस मराठी'च्या घरातला प्रवास संपला
Ankita Walawalkar Eliminate : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. पाचवा आठवडा सरत आला आणि आता सदस्यांचे खरे चेहरे दिसू लागले आहेत. त्यानंतर आता प्रत्येक स्पर्धकाच्या खेळात बदल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून प्रत्येक स्पर्धकाच्या वागण्यात शिवाय बोलण्यात प्रचंड फरक पडलेला पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात १२ स्पर्धक आहेत. त्यातील कोणता स्पर्धक आज बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं.
पाचव्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर असे चार स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत. आता या स्पर्धकांमध्ये कोणता स्पर्धक नॉमिनेट होणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकताच ‘भाऊच्या धक्का’वरील एक प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये आजच्या दिवशी घराबाहेर कोण जाणार ? हे पाहायला मिळालं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात ‘कोकण हार्टेड गर्ल’चा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास आता संपला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरावर कोकणाच्या चेडवाचा राज पाहायला मिळाला. पण अंकिता आता अचानक घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो सर्वांना थक्क करणारा आहे. प्रोमोमध्ये रितेश म्हणतो की, “या घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे अंकिता”. त्यानंतर अंकिता तिच्या नावाची पाटी घेऊन सर्व सदस्यांची भेट घेऊन घराबाहेर पडताना दिसत आहे. अंकिताचा प्रवास संपल्याने डीपी दादा आणि सूरजला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत.
हे देखील वाचा – “फ्लावर समझे क्या, फायर है अपुन…” शिव ठाकरेचा खतरनाक लूक पाहिलात का ?
‘बिग बॉस मराठीच्या घरात आता खेळाला रंगत येऊ लागली आहे. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घराची पहिली कॅप्टन अंकिता प्रभू-वालावलकर घराबाहेर पडली आहे. अंकिताने बिग बॉस मराठीचा खेळ चांगल्या खेळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी ती कमी पडल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. शिवाय, आजच्या एपिसोडमध्ये, ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्य वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहेत. सूरजची झापुक झुपक स्टाईल आणि जान्हवीचा दिलखेच अंदाज पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे भाऊच्या धक्क्यावर अभिजीत आणि निक्कीचा कपड डान्सदेखील पाहायला मिळणार आहे. सर्व जोड्यांचा कल्ला पाहण्यासाठी ‘बिग बॉस प्रेमी’ खूप उत्सुक आहेत.