भाऊच्या धक्क्यावर अरबाजची घेणार रितेश देशमुख शाळा
बिग बॉस मराठीचा सीझन 5 सुरू होऊन महिना झालाय आणि महिनाभरातच सर्व समीकरणं बदलली आहे. गेला पूर्ण आठवडा अरबाज पटेलसह संपूर्ण घर उभं राहिलं होतं आणि संपूर्ण घराने निक्की तांबोळी आणि अभिजित सावंत यांना टारगेट केलेलं दिसून आलं. मात्र आता अरबाज पटेलने नक्की असं काय केलं की रितेश देशमुख त्याची शाळा घेणार आहे हे प्रोमोमधून कळून येत आहे.
निक्की नेहमी एक स्टँड घेताना दिसते आणि उत्तम खेळते. तिची भाषा आणि वागणं बरेचदा खटकू शकतं. पण तिचे मुद्दे योग्य असतात असं अनेकांना वाटतं. मात्र यावेळी मागच्या आठवड्यात संपूर्ण घर निक्कीच्या विरोधात उभं राहीलं आणि घराचा म्होरक्या होता अरबाज पटेल. यावरूनच भाऊच्या धक्क्यावर निवेदक रितेश देशमुख त्याची शाळा घेताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
काय म्हणतो रितेश पाहा प्रोमो
हेदेखील वाचा – छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस मराठी’ने रचला नवा विक्रम
अरबाजसाठी चक्रव्यूह रूम
भाऊच्या धक्क्यावर अरबाजमुळे घरच्यांसाठी परत उघडली जाणार चक्रव्यूह रूम. यानंतर तरी आता घरच्या सदस्यांचे डोळे उघडणार का याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलीये. बिग बॉस या खेळाचे प्रचंड चाहते आहेत आणि हा एक वेगळाच खेळ आहे. केवळ टास्क नाही तर भावनांचाही हा खेळ आहे आणि या आठवड्यात तर वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या भावना पाहयाला मिळाल्या आहेत.
काय ठरणार अरबाज निक्कीचं भवितव्य
अरबाज पटेल आतमध्ये अत्यंत वाईट खेळत असल्याचं सध्या चित्र आहे. तो बाहेर एका महिलेशी कमिटेड असूनही आतमध्ये निक्कीबरोबर भावनिक खेळत असल्याचे सध्या सोशल मीडियावरील कमेंट्सवरून दिसून येत आहे. इतक्या खालच्या थराला खेळण्याची गरज नाही असंही अनेक जण म्हणत आहे. तर अनेक जण त्याच्या बाजूने उभे राहिले असून अरबाज अत्यंत चांगले खेळत असल्याचेही म्हणत आहे. मात्र गेल्या आठवड्यात निक्की आणि अरबाजच्या भावनांचं पूर्ण समीकरणच बदललं आहे. आता हे दोघे पुन्हा एकत्र येणार की नाही हे सर्वांना पाहायचं आहे.
निक्कीने माफ करू नये
अनेकांना असं वाटतंय की, निक्कीने आपला स्वाभिमान जपत अरबाजला या गोष्टीसाठी अजिबात माफ करू नये. खेळातही निक्कीला अत्यंत वाईट शब्द अरबाजने वापरले होते. त्यानंतरही निक्की त्याच्याशी बोलायला गेली हे तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. मात्र आता रितेश देशमुख पुन्हा एकदा निक्कीला योग्य दिशा दाखवणार का? हेच पाहावे लागणार आहे. यावर्षीचा सीझन तुफान गाजतोय. कधी निक्कीच्या वागण्यामुळे तर कधी अरबाजच्या रागामुळे. पण सर्वाधिक प्रशंसा केली जातेय ती म्हणजे अभिजीत सावंतच्या संयमाची. या वर्षीच्या बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी अभिजीतचं नाव आता त्याच्या गेममुळे पुढे येत आहे.