
राधा पाटीलचा घरातून पत्ता कट (फोटो सौजन्य - Colors Marathi)
राधा पाटीलला दाखवला घराबाहेरचा रस्ता
गेल्या १५ दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या घरात तुफान खेळ रंगलाय आणि राधा पाटीलच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. तिने घरात आपल्या बॉयफ्रेंडविषयीदेखील अगदी रंगवून चर्चा केल्या होत्या. दरम्यान या आठवड्यात घराबाहेर पडण्याचे पहिलेच नाव हे राधा पाटील असल्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे. विशालसह जोडी आणि मैत्री कदाचित राधाला महागात ठरली असल्याचीही आता चर्चा रंगू लागली आहे.
रितेश भाऊंचा शाब्दिक मार
भाऊच्या धक्क्यावर प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊंचा जबरदस्त शब्दिक दणका ऐकायला मिळाला. “भावाला आणलाय? सांगा आता काय सांगणार… हे बिग बॉसचं घर आहे, इथे मस्ती नाही तर शिस्त चालते” हा रितेश भाऊंचा एकच संवाद घरातील सगळ्यांची बोलती बंद करणारा ठरला. गेल्या आठवड्यात घरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी, नियमभंग आणि ढासळणारे नातेसंबंध यामुळे घर अधिकच तापलेलं दिसलं.
छोट्या पडद्यावर ‘Bigg Boss Marathi 6’चा डंका! रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर
काही सदस्यांची वाढती मैत्री
काही सदस्यांमध्ये मैत्री घट्ट होताना दिसली, तर काहींच्या नात्यांमध्ये तुटवडा जाणवला. राकेश बापट याने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन आणि प्राजक्ताच्या भजनाने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि या भावनिक क्षणांचं सर्वत्र कौतुक झालं. याच पार्श्वभूमीवर ‘भाऊचा धक्का’ मध्ये रितेश भाऊ चुकीच्या वागणुकीवर थेट जाब विचारताना दिसला. “जेव्हा मिळणार chance, तेव्हा भाऊच्या धक्क्यावर होणार dance!” अशा हलक्याफुलक्या क्षणांनी एपिसोडमध्ये रंगतही आणली.
राधा पाटीलच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, आणिपुढच्या भाऊच्या धक्क्यानंतर कोणाची शाळा तर कोणाला शाबासकी मिळणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.