
फोटो सौजन्य - Colors सोशल मीडिया
बिग बॉस मराठी : बिग बॉस मराठी सिझन पाच आता शेवटच्या टप्प्यात आहे. ६ ऑक्टोबर रोजी या सीझनचा फिनाले आयोजित करण्यात आला आहे. मागील आठवड्यामध्ये स्पर्धेकांच्या घरातील आले होते, यावेळी संपूर्ण घर भावुक झालं होत. हा आठवडा बिग बॉस मराठी सिझन पाचचा शेवटचा आठवडा असणार आहे. त्यामुळे बरेच मनोरंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर शनिवारच्या भागामध्ये सुद्धा राखी सावंत, अभिजित बिचुकले यांनी एंट्री केली होती. यावेळी राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता कलर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर नवा प्रोमो आला आहे. यामध्ये निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांच्यामध्ये पुन्हा वाद पेटला आहे.
निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर वाद हा सूरजला बोलल्यामुळे झाला आहे. अंकिता सूरजला सांगत असते की तू खुर्चीवर पण सांडवल आहेस का? यावर निकी अंकिताला म्हणते की, जाऊदेत ना किती त्याला टोकणार आहेस. यावर अंकिता सुरजला चिडून म्हणते की, ती सांगेल ते ऐक… त्यानंतर निक्की पुन्हा बोलते की, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला टोमणा टोकायचं. तुम्ही त्याला घर देताय म्हणून त्याच्यावर अत्याचार करू नका. यावर बाथरूम भागामध्ये जाऊन अभिजित सावंत पंढरीनाथ कांबळे यांना म्हणतो की, सारखं सारखं टोकण त्याला आवडत नाही. यावेळी पॅडी म्हणतात की, निक्कीच्या मताशी सहमत आहेस तू.
पुढे निक्की घरासमोर म्हणते की, तुमचं खरं बाहेर आलं ना की तुम्हाला टोचत. यावरून हा वाद किती पेटतो हे पाहण मनोरंजक ठरेल. अजुनपर्यत स्पर्धेमध्ये ८ स्पर्धक टिकून आहरेत, त्यामुळे आजच्या भागामध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. या आठवड्यामध्ये सगळे स्पर्धक नॉमिनेट आहेत, त्यामुळे कोणता खेळाडू जाणार हे सांगणं कठीण आहे. आतापर्यत स्पर्धेमध्ये निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अभिजित सावंत हे स्पर्धक घरामध्ये टिकून आहेत.