फोटो सौजन्य - JIO Cinema
बिग बॉस ओटीटी सिझन ३ : बिग बॉस ओटीटी सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीचे दोन सिझन चांगलेच गाजले होते त्यानंतर आता हा तिसरा सीझनही चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस त्याच्या घरातील स्पर्धकांना नवनवे आव्हान देत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस फिनाले जवळ येत आहेत तसतसं बिग बॉसचा खेळ हा मनोरंजक होत चालला आहे. यंदा बिग बॉस ओटीटी सिझन ३ बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर होस्ट करत आहे. हा खेळांमधून काही स्पर्धकांचा पत्ता कट झाला आहे तर काही स्पर्धक अजूनही या स्पर्धामध्ये टिकून आहेत. रविवारच्या भागामध्ये कोणत्या स्पर्धकांचा पत्ता कट होणार यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
बिग बॉसच्या घरामधून प्रत्येक आठवड्याला एका स्पर्धकांना प्रेक्षकांच्या नापसंतीमुळे घराबाहेर करण्यात येते. मागील आठवड्यामध्ये वडापाव गर्लचा पत्ता कट झाला होता तर आता बिग बॉस घरामधून प्रसिद्ध पत्रकार दीपक चौरासिया यांचा प्रवास संपलेला आहे. दीपक चौरासिया यांनी फार काही विशेष घरामध्ये केले नाही त्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी जेव्हा घरामध्ये प्रवेश केला होता तेव्हा पायाला झालेल्या दुखापतीमुळे ते फार जास्तवेळ त्यांची छाप सोडू शकले नाही.
Exclusive and Confirmed #DeepakChauarsia has been ELIMINATED from the house
— The Khabri (@TheKhabriTweets) July 20, 2024
बिग बॉसच्या घरामध्ये काही स्पर्धक फार लवकर घराबाहेर झाले होते. यामध्ये चंद्रिका दीक्षित, पौलोमी दास, मुनिशा कटवानी, दीपक चौरासिया, नीरज गोयत, पायल मलिक या स्पर्धकांना शो मधून प्रेक्षकांच्या वोटिंगने बाहेर काढण्यात आले आहे.
ज्याप्रकारे फिनाले जवळ येत आहे तसतसा खेळ मनोरंजक होत चालला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अजुनपर्यत सना मकबूल, नेझी, लव्ह कटारिया, सना सुलतान, साई केतन राव, रणवीर शोरे, अरमान मलिक, कृतिका मलिक, शिवानी कुमारी, विशाल पांडे आणि वाईल्ड कार्ड एंट्री अदनान शेख हे खेळाडू अजुनपर्यत बिग बॉसच्या घरामध्ये टिकून आहेत.