Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती

अनिल कपूर-राधिका मदान यांचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याचे नाव आहे ‘सूबेदार’. या चित्रपटामधील ‘लल्ला अँथम’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आणि या गाण्याला हरभजन सिंह यांची खास उपस्थिती लाभली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 06:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अनिल कपूर-राधिका मदान यांचा आगामी चित्रपट
  • ‘सूबेदार’ मधील ‘लल्ला अँथम’ गाणं रिलीज
  • गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती
 

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ हे दमदार गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या जोशपूर्ण अँथममध्ये भारताचे एक्स क्रिकेटपटू हरभजन सिंह विशेष उपस्थितीत झळकले आहेत. त्याचबरोबर ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांचीदेखील प्रभावी झलक या म्युझिक व्हिडिओत पाहायला मिळाली आहे. रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गीतलेखन ऋषी उपाध्याय यांनी केले असून, प्रसिद्ध गायक विशाल ददलानी यांनी आपल्या दमदार आवाजात हे अँथम सादर केले आहे.

संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना प्राइम व्हिडिओने ‘द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’च्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला आहे. हा हाय-एनर्जी ट्रॅक आगामी अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट सूबेदारमधील ‘लल्ला’ या मूळ गाण्यावर आधारित आहे. क्रिकेटच्या हंगामातील जोश, स्टेडियममधील जल्लोष आणि देशभक्तीची भावना यांचा सुरेख संगम या अँथममध्ये पाहायला मिळतो आहे.

TRP च्या शर्यतीत झी मराठीच्या मालिकांनी मोडले रेकॉर्ड; ‘या’ लोकप्रिय मालिकेला मागे सारत ‘कमळी’ची टॉप 2 मध्ये एन्ट्री

‘सूबेदार’ हा चित्रपट भारताच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असून अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रेरणादायी प्रवास यात उलगडणार आहे. शिस्त, अभिमान आणि अढळ नैतिक मूल्यांवर जगणारा अर्जुन मौर्य प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जातो. लवचिकता, सन्मान आणि कर्तव्यनिष्ठा या भावनांचा ठसा चित्रपटात ठळकपणे उमटतो आहे. ज्या भावना मोठ्या जागतिक स्पर्धांदरम्यान प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत होतात.

 

या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील उत्साह आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा प्रभावी मिलाफ साधण्यात आला आहे. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान यांची उपस्थिती गाण्याला अधिक आकर्षक बनवते. ‘भारत आर्मी’ आणि शेफाली बग्गा यांच्या सहभागामुळे गाण्यात आत्मविश्वास, स्वॅग आणि राष्ट्रीय अभिमानाची ठळक झलक दिसून येते आहे. रोहन-विनायक यांच्या जोशपूर्ण संगीतासोबत ऋषी उपाध्याय यांच्या प्रभावी शब्दांची जोड आणि विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणे आणखी खास बनले आहे.

अनिल कपूर यांनी या गाण्याबद्दल मत मांडताना म्हणाले की, “‘सूबेदार’ ही अशा व्यक्तीची कथा आहे ज्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणि अंतर्मनातील ज्वाळा यांतून शक्ती मिळते. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे. सूबेदार अर्जुन मौर्य शांत आणि संयमी असला तरी योग्य वेळी ठामपणे उभा राहतो. सेटवरील ऊर्जा अप्रतिम होती. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.” असे ते म्हणाले आहेत.

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

हरभजन सिंह यांनीही आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, “‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’चा भाग होणे हा विशेष अनुभव होता. अनिल कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे एका संस्थेसोबत काम करण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा प्रेरणादायी आहे. या गाण्याची बीट दमदार असून क्रिकेटच्या सध्याच्या उत्साहाशी ती पूर्णपणे सुसंगत आहे.”

‘भारत आर्मी’नेही प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे उत्कटता, विश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत संघाच्या पाठीशी उभे राहणे आहे. ‘लल्ला – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’मध्येही तीच ज्वाला आणि अभिमान जाणवतो.” या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. ‘तुम्हारी सुलु’, ‘जलसा’ आणि ‘दलदल’ यांसारख्या उत्कृष्ट कथांसाठी ते ओळखले जातात. तसेच चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे. ‘सूबेदार’ हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Web Title: Lalla anthem warning from subedar movie anil kapoor harbhajan singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.