
entertainment (फोटो सौजन्य: social media)
गेल्या अनेक वर्षांत अंकुश चौधरी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक विश्वासार्ह आणि बहुआयामी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विविध पैलू असलेल्या भूमिका आजवर त्याने साकारल्या आहेत. अगदी तीव्र भावनिक नाट्यकथांपासून ते रोमँटिक मनोरंजनात्मक भूमिका आणि थरारक गुन्हेगारी कथांपर्यंत त्यांच्या अभिनयात बहुआयामी रूप अनुभवयाला मिळतात. संभ्रमात असलेला प्रियकर असो, स्वप्नांच्या मागे धावणारा सामान्य माणूस असो किंवा स्पष्टवक्ते, कणखर तपास करणारा अधिकारी प्रत्येक भूमिकेत अंकुश चौधरी ने त्याचा अभिनयाची छाप सोडली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिनयातील वेगवेगळे पैलू दाखवणाऱ्या आणि तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हव्या अशा अंकुश चौधरी यांच्या पाच खास भूमिका !
देवखेळ (ZEE5)
मराठी सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर ‘देवखेळ’ मध्ये अंकुश चौधरी इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे यांच्या भूमिकेत दिसतोय. कोकणातील एका समुद्रकिनारी वसलेल्या गावात शिमग्याच्या सणादरम्यान घडणाऱ्या रहस्यमय मृत्यूंच्या मालिकेची चौकशी करण्यासाठी त्यांची नियुक्ती होते. गावकऱ्यांचा विश्वास आहे की या हत्या एखाद्या पौराणिक शक्तीमुळे होत आहेत, मात्र विश्वास अंधश्रद्धेला न जुमानता मानवी प्रवृत्ती, लपलेली सत्यं आणि गुपितांचा शोध घेण्याचा निर्धार करतो. या भूमिकेत अंकुश चौधरी यांनी अत्यंत सूक्ष्म आणि स्तरित अभिनय साकारला आहे वरवर शांत, पण आतून द्वंद्वात अडकलेला भीती आणि लोककथांनी व्यापलेल्या या जगात ते तर्क, भावना आणि ताण यांचा समतोल साधताना दिसतात. ‘देवखेळ’ मधील ही भूमिका त्यांना संयम, अधिकार आणि असुरक्षितता हे तिन्ही पैलू एकाच वेळी प्रभावीपणे उलगडण्याची संधी देते.
डबल सीट (ZEE5)
‘डबल सीट’ हा अंकुश चौधरी च्या सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक ड्रामांपैकी एक आहे. या चित्रपटात तो आपल्या कुटुंबासाठी चांगले आयुष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय पुरुषाची भूमिका साकारताना बघायला मिळाला होता. मुक्ता बर्वे आणि अंकुश नव्याने विवाहबंधनात अडकलेला पती म्हणून ते शहरी मुंबईत महत्त्वाकांक्षा, जबाबदाऱ्या आणि भावनिक तडजोडी यांचा समतोल साधताना यात दिसले होते. या भूमिकेची खासियत म्हणजे तिची सहजता आणि जवळीक दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, शांत आशा आणि वैवाहिक नात्यातील ऊब अंकुश चौधरी अतिनाट्य न करता अत्यंत प्रामाणिकपणे मांडली होती. ‘डबल सीट’ हा अनुभवलेला, जिवंत वाटणारा चित्रपट आहे आणि अंकुश यांचा प्रामाणिक अभिनयच या कथेचा खरा आधार ठरतो यात शंका नाही.
दुनियादारी (Amazon Prime Video)
मराठी चित्रपटसृष्टीतील एक कल्ट फेव्हरेट ठरलेला ‘दुनियादारी’ हा चित्रपट ७०च्या दशकाच्या उत्तरार्धातील कॉलेज जीवनाच्या पार्श्वभूमीवर मैत्री, प्रेम, स्पर्धा आणि ‘कमिंग-ऑफ-एज’ प्रवास उलगडतो. या एन्सेंबल कास्टमध्ये अंकुश चौधरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता आणि चित्रपटाच्या भावनिक पाया मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.नॉस्टॅल्जिया आणि संघर्ष यांचा सुंदर समतोल साधणाऱ्या या कथेत अंकुश चा अभिनय प्रामाणिकपणा आणि भावनिक खोली घेऊन येतो. त्यांची व्यक्तिरेखा त्या काळाशी घट्ट जोडलेली वाटते, त्यामुळे नातेसंबंध आणि तणाव आजही प्रेक्षकांना तितक्याच तीव्रतेने भिडतात.
ट्रीपल सीट (ZEE5)
‘डबल सीट’ चा आध्यात्मिक उत्तराधिकारी मानला जाणारा ‘ट्रिपल सीट’ हा प्रेम, बांधिलकी आणि गुंतागुंतीच्या नात्यांभोवती फिरणारा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा आहे. या चित्रपटातून अंकुश चौधरी पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत परतताना दिसला होता. मैत्री, प्रेम आणि योग्य वेळ एकमेकांवर आदळल्यावर नात्यांमध्ये काय घडते, याचा वेध हा चित्रपट घेतो. या भूमिकेत अंकुश आपल्या सहज आकर्षणासोबत लक्षात राहतो.
क्लासमेट (Amazon Prime Video)
‘क्लासमेट्स’ हा अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणाऱ्या कॉलेजमधील मित्रांच्या दोस्तीचा आठवणींनी भरलेला भावनिक चित्रपट होता. जुन्या मैत्री, अपूर्ण प्रेमकथा आणि न सुटलेल्या भावनांचा मागोवा घेत हा चित्रपट पुढे सरकतो. या कथेला भावनिक दिशा देण्यात अंकुश चौधरी यांची भूमिका महत्त्वाची ठरते. विनोद, रोमँस आणि नाट्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या चित्रपटात अंकुश यांच्या अभिनयामुळे कथेला वेगळा दर्जा मिळतो आणि त्याची भूमिका उठावदार ठरते.
सध्या अभिनेता अंकुश चौधरी देवखेळ या वेब सीरिज मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून भविष्यात तो अश्याच अजून उत्तम भूमिका मध्ये दिसणार असल्याचं कळतंय.
Ans: ZEE5 वरील सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर वेबसीरिज ‘देवखेळ’ मुळे.
Ans: ‘डबल सीट’ आणि ‘ट्रिपल सीट’ मधील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली.
Ans: सहज अभिनय, भावनिक खोली आणि प्रत्येक भूमिकेत प्रामाणिकपणा ही त्यांची मोठी ताकद आहे.