Akshay Kumar मालामाल, दुप्पट किंमतीत विकला मुंबईतला फ्लॅट; किंमत ऐकूण व्हाल थक्क...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ह्याने आपला मुंबईतल्या बोरिवली पूर्वेतील अलिशान घर विकले आहे. अभिनेत्याचं बोरिवली पूर्वेत एक अलिशान घर आहे, जे त्याने काही दिवसांपूर्वीच विकलं आहे. त्याला विकलेल्या घराची दुप्पटीने किंमत मिळाली आहे. रियल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्याने त्याचा अपार्टमेंट ४.२५ कोटींना विकला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारनं २०१७ मध्ये बोरिवली पूर्वेत एक फ्लॅट खरेदी केला होता. तेव्हा त्याची किंमत ही २.३८ कोटी इतकी होती. आता त्यानं हाच फ्लॅट दुप्पट किंमतीत विकलाय. त्यानं हा फ्लॅट आता ४.२५ कोटींमध्ये विकल्याची माहिती आहे. अक्षयनं हा फ्लॅट ओबेरॉय रिॲलिटीनं डेव्हलेप केलेल्या स्काय सिटी या प्रोजेक्टमध्ये विकत घेतला होता. या विक्रीत अभिनेत्याला ७८ टक्के नफा झाल्याचं समोर आलं आहे.
स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षयचा हा फ्लॅट १०७३ चौरस फुटाचा होता. शिवाय, त्याच्या अपार्टमेंटमध्ये दोन कारचं पार्किंगही होता. हा फ्लॅट खरेदी करताना त्यानं २५ लाखांची स्टॅंप ड्युटी आणि ३०,००० रुपयांचं नोंदणी शुल्क भरलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनसह अनेक सेलिब्रिटींचे ओबेरॉय रिॲलिटीच्या स्काय सिटीमध्ये मालमत्ता आहेत.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्याचे गेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. २०२५ या वर्षातला अक्षयचा पहिला वहिला ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. पण या चित्रपटालाही प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे अक्षयने चित्रपट रिलीज झाल्या झाल्या लगेचच फ्लॅट विकला… यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…
अक्षय सध्या पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांच्या दोन मुलांसोबत मुंबईतल्या जुहूपरिसरात आलिशान सी-फेस डुप्लेक्समध्ये राहतो. या आलिशान घराची किंमत 80 कोटींहून अधिक आहे. अक्षय कुमारच्या या घरात सर्वच अत्याधुनिक सुखसोयी आहेत. यात एक वॉक- इन कपाट, एक होम थिएटर आणि एक अद्भुत गार्डन एरिया आहे. याशिवाय या बॉलिवूड अभिनेत्याच्या घरातून अरबी समुद्राचे विहंगम दृश्यही पाहायला मिळते. GQ च्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारकडे खार वेस्टमधील जॉय लीजेंडमध्ये एक आलिशान फ्लॅट देखील आहे. अभिनेत्याने 2022 मध्ये खार पश्चिम येथील या फ्लॅटसाठी 7.8 कोटी रुपये दिले होते. अक्षय कुमारचा हा फ्लॅट रेसिडेंशियल कॉम्प्लेक्सच्या 19व्या मजल्यावर असून तो 1878 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या मालमत्तेत चार वाहनांच्या पार्किंगसाठीही जागा आहे.