माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली...
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग आणि अमेय वाघसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर, समीक्षकांसह आणि मराठी इंडस्ट्रीतले कलाकारही चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिने ‘फसक्लास दाभाडे’चित्रपटाचं कौतुक करत सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने ‘फसक्लास दाभाडे’ हा मराठी चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहन प्रेक्षकांना केलेलं आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
आपल्या अदाकारी आणि निस्सिम सौंदर्याच्या जोरावर बॉलीवूडमध्ये ९० चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फार मोठा चाहतावर्ग आहे. ती मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’सिनेमाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी कमालीची चर्चेत आली आहे. सिद्धार्थ चांदेकरला टॅग करत तिने संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
माधुरी दीक्षितने आपल्या सोशल मीडियावरून सिद्धार्थ चांदेकर आणि ‘फसक्लास दाभाडे’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. तसेच ‘फसक्लास दाभाडे’चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहन केले आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये माधुरीने लिहिलंय की, “सिद्धार्थ चांदेकर आणि टीम तुम्हा सर्वांचं ‘फसक्लास दाभाडे’या नव्या चित्रपटासाठी खूप खूप अभिनंदन! ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल खूप खूप आभार. हा सुंदर अनुभव घेण्यासाठी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन ‘फसक्लास दाभाडे’नक्की पाहा आणि ‘फसक्लास’ अनुभव घ्या!”
“तू लढ! बाकी तेरा आदमी…”; सिद्धार्थ चांदेकरची पत्नीसाठी खास पोस्ट, हेमंत ढोमेच्या कमेंटने वेधलं लक्ष
या कॅप्शनसोबत धकधक गर्लने चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे. सिद्धार्थ चांदेकरने ही स्टोरी रिशेअर करत, “खूप खूप धन्यवाद MD” असं म्हणत अभिनेत्री माधुरी दीक्षितचे आभार मानले आहेत. दरम्यान, ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाबद्दल बद्दल सांगायचं तर, चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, राजसी भावे, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, राजन भिसे, उषा नाडकर्णी आणि मिताली मयेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. आता ‘फसक्लास दाभाडे’ प्रेक्षकांच्या मनावर कशी जादू करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.