Actress Mamta Kulkarni Took Sannyas Wore Saffron Clothes At The Prayagraj Mahakumbh Mela 2025
शाहरुख खान आणि सलमान खानच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे. ती भारतात डिसेंबर महिन्यात परतली आहे. केनियातून २५ वर्षांनंतर मायदेशी परतलेली ममता कुलकर्णी प्रयागराज महाकुंभात पोहोचली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने प्रयागराजच्या महाकुंभात सहभागी होत निवृत्तीची घोषणा केली आहे.
माधुरी दीक्षितकडून ‘फसक्लास दाभाडे’चं कौतुक, सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत ‘धकधक गर्ल’ म्हणाली…
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला असून अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यात येऊन संन्यासी झाली आहे. ममता कुलकर्णी यांनी स्वत: संगमच्या काठावर स्वतःच्या हातांनी पिंड दान केले. सायंकाळी ममताचा पट्टाभिषेक सोहळा होणार आहे, त्यानंतर ती महामंडलेश्वर बनतील.
ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वरची दिक्षा घेतल्यानंतर त्यांना आजपासून नवीन नाव देण्यात येणार आहे. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. किन्नर आखाड्याचे अध्यक्ष आणि जुना आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला दीक्षा दिली आहे. किन्नर आखाड्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही, म्हणून ते सध्या जुना आखाड्याशी जोडले गेले आहे. संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीने आता भगवे कपडे परिधान केले आहेत.
सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
दरम्यान, ममता कुलर्णीने संन्यास घेतल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीची चाहत्यांमध्ये फार मोठी क्रेझ होती. ‘तिरंगा’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले. ममता चाहत्यांमध्ये फक्त आपल्या अभिनयामुळेच नाही तर, सौंदर्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली.
ममता कुलकर्णी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत राहिली आहे. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. त्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमधून गायब झाली. अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी ममता आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यशाच्या शिखरावर असताना अचानक तिच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली. ममताने ‘तिरंगा’ शिवाय, ‘आशिक’, ‘आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक्त हमारा हैं’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘करण अर्जुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.. तिला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं, कारण तिने अनेक चित्रपटांची ऑफर धुडकावून लावली होती.