"मी नाटकी, पण..." ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असं का म्हणाले ?
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर सध्या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. त्यांचा येत्या काही दिवसांत ‘वनवास’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. नुकताच त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रमोशन दरम्यान त्यांनी शुटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले.
‘कलर्स मराठी’वर मिळणार प्रेक्षकांना दत्तजयंतीनिमित्त भक्तीमय पर्वणी, वाचा केव्हा ?
चित्रपटाची शुटिंग बनारसमध्ये झाली आहे, शुटिंग दरम्यानचे किस्से नाना पाटेकर यांनी बिग बींसोबत शेअर केले आहे. यावेळी नाना म्हणाले की, बनारस नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळचं ठिकाण आहे आणि या चित्रपटाचे शूटिंगही बनारसमध्ये झाली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये, नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहिले होते. नाना पाटेकर हे होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसलेले होते. यावेळी नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्माने शुटिंगसह अनेक अनुभव शेअर केले आहेत.
अल्लू अर्जुनला दिलासा, तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
अभिनयाबद्दल नाना म्हणाले की, मी प्रत्येक नवीन अभिनेत्याला प्रवास करून जग पाहण्याचा सल्ला देतो. त्याच प्रमाणे उत्कर्षलाही मी सल्ला दिला होता. शिवाय ते नवे असल्यामुळे त्यांना मी लोकांसोबत संवाद साधण्याचाही सल्ला देतो. नाना पुढे म्हणाले की, “जोपर्यंत तुम्ही लोकांचे चेहरे ओळखू नाही, तोपर्यंत तुम्ही व्यक्तिरेखा कशी साकारणार? जर तुम्ही अभिनेता झालात आणि तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही बाहेर पडलात की, तुम्हाला लोकं लगेच ओळखू शकतील, ही बाब तुमचा अडथळा होऊ नये. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की, तुम्ही फिरा आणि लोकांची भेट घ्या. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही अभिनेता म्हणून लहान व्हाल.
अल्लू अर्जुनच्या अटकेवर बॉलिवूडमधली पहिली प्रतिक्रिया, वरुण धवन काय म्हणाला ?
नाना पुढे म्हणाले की, जोपर्यंत मी तुला ओळखत नाही, तुझ्या आयुष्याला ओळखत नाही, तोपर्यंत मी तुझी भूमिका कशी साकारणार? नानांनी सांगितले की ते मंदिरात जाऊ शकत नाही. मी ढोंगी नाही, परंतु मला ती गोष्ट करायला आवडत नाही. माझ्या आयुष्यात, मला अनेक महान व्यक्तींना भेटण्याची संधी मिळालीये, जे स्वतःमध्ये खूप खास आहेत, त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. नानांनी शुटिंगदरम्यानचे काही किस्से सांगितले, ते म्हणाले की, “शिमल्यात बर्फवृष्टी दाखवण्यासाठी आम्ही ६०० पोते मीठ घेतले होते, पण देवाची कृपा बघा, अचानक जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली आणि आम्ही चित्रपटात नैसर्गिक बर्फ दाखवला. बनारसमधला शुटिंग दरम्यानचा अनुभव सांगताना नाना म्हणाले की, शूटिंगदरम्यान मी एका व्यक्तीच्या कानाखाली मारली होती. याबद्दल मी त्यांची माफीही मागितली होती. मी खूप दबावाखाली काम करतो हेही लोकांनी समजून घेतले पाहिजे.