"देवा आला रं..." शाहिद कपूरच्या Deva चित्रपटाचा ॲक्शन- रावडी टीझर रिलीज
” ‘देवा’ आला रं…” असं म्हणत शाहिद कपूरच्या मोस्ट अवेटेड ‘देवा’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर शाहिद कपूर ‘देवा’ चित्रपटाच्या माध्यमातून ॲक्शन- रावडी अंदाजातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याची अफलातून ॲक्शन आणि केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत अभिनेता पाहायला मिळत आहे. फार मोठ्या ब्रेकनंतर शाहिद मोठ्या पडद्यावर दमदार ॲक्शनसह दिसणार आहे. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर प्रॉडक्शनच्या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.
अभिनेता किरण मानेने शेअर केली Mufasa The Lion King साठी खास पोस्ट, केलं किंग खानचं विशेष कौतुक
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पहिला- वहिला पोस्टर रिलीज झाला होता. ज्यामध्ये शाहिद खूपच दमदार दिसत होता. ‘देवा’च्या निर्मात्यांनी आता सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांची कमालीची उत्कंठा वाढली आहे. ‘देवा’चा ५२ सेकंदांचा टीझर प्रेक्षकांच्या पसंदीस पडला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरच्या सुरूवातीला शाहिद कपूर डान्स करताना करताना दिसत आहे. डान्सनंतर शाहिद आपल्या मिशनसाठी निघालेला दाखवण्यात आला आहे.
टीझरमध्ये पुढे, एका केसमध्ये त्याला पकडण्यात येते त्यावेळी तो बंदुक पकडून ॲक्शन करताना दाखवण्यात आला आहे. चित्रपटातील अभिनेत्याचा अँग्री यंग मॅन लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची जबरदस्त उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरच्या शेवटी अभिनेत्याला ‘आला रे आला देवा आला’ अशी ओळ देण्यात आली आहे. नेहमीच्या आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारा शाहिद यावेळी सुद्धा आपली एक वेगळी छाप पाडेल यात काही शंका नाही.
झी स्टुडिओजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ॲक्शन, रोमान्स आणि फुल्ल मनोरंजनचा मिलाप असलेला हा टीझर शेअर करण्यात आलेला आहे. नेहमीप्रमाणेच या चित्रपटातूनही शाहिदची वेगळी स्टाईल चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.