‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली मर्सिडीज बेंझ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम...”
‘आई कुठे काय करते’मालिकेमध्ये संजनाचं पात्र साकारत अभिनेत्री रुपाली भोसले चांगलीच प्रसिद्ध झाली. तिच्यासाठी २०२४ हे वर्ष कमालीचं खास ठरलं आहे. तिने आपल्या स्वकतृत्वावर अभिनेत्रीने अनेक गोष्टी साध्य करुन दाखवल्या आहेत. २०२४ मध्ये अभिनेत्रीने स्वत:साठी घर खरेदी केलं. त्यानंतर तिने दिवाळीमध्ये भावासाठी अलिशान कार खरेदी केली होती. आता २०२५ च्या सुरुवातीला अभिनेत्रीने स्वत:साठी नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आणि आपल्या मित्र मैत्रिणींना ही गुड न्यूज दिली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेने मर्सिडीज बेंझ ही अलिशान कार खरेदी केली आहे. नव्या कारचा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने सुंदर कॅप्शन दिले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला रुपालीने कॅप्शन दिले की, “नक्कीच मी एक दिवस तुझी मालकीण होईन ते आज यासाठीच हे सर्व सुरू झालं… तुम्ही आयुष्यात फक्त स्वप्नं पाहून नका, तर ती स्वप्नं जगा. त्या स्वप्नांवर प्रेम करा आणि जोखीम घ्या. कितीही कठीण असलं तरीही स्वतःला वचन द्या. तुम्ही तुमची स्वप्नं कधीच सोडू नका. तुम्ही काय करू शकत नाही हे स्वतःला सांगू नका. तर तुम्ही काय करू शकता हे स्वतःला सांगा. वेलकम बेबी… चल आता एकत्र पुढे प्रगती करत जाऊ. राधे राधे…”
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुपाली आपल्या फॅमिलीसोबत नव्या कारचं स्वागत करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री गाडीची पूजा करताना आणि केक कापताना दिसत आहे. या खास क्षणासाठी शोरुम रुपालीच्या फोटोंनी आणि फुग्यांनी सजवलेलं पाहायला मिळत आहे. नेमकी अभिनेत्रीने कोणत्या मॉडेलची कार खरेदी केली आहे. याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. अभिनेत्री रुपाली भोसलेने नवी गाडी खरेदी केल्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री रेश्मा शिंदे, साक्षी गांधी, गिरीजा प्रभु, रुतुजा देशमुख, शुभी शर्मा, सुकन्या काळणसह अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Mission Grey House चा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन पॅक्ड ट्रेलर रिलीज, ‘त्या’ खुणाचा पोलिस कसा लावणार छडा