‘आश्रम ३’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहनकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
बॉबी देओल, ईशा देओल आणि त्रिशा चौधरी स्टारर ‘आश्रम’ वेब सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि एम एक्स प्लेअर या दोन्हीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वेबसीरीजचे तीनही सीझन्स प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सीरीजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून या सीरीजची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरीजमध्ये पम्मीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान या सीरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे.
बाबिलच्या व्हायरल व्हिडिओवर आईने दिले स्पष्टीकरण, सुतापा खान नक्की काय म्हणाली ?
एका मुलाखतीमध्ये, आदितीने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. ‘आश्रम’च्या शूटिंगवेळी अदिती पोखनकरवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. या कठीण काळाचा तिने कशा पद्धतीने सामना केला आणि तिच्या वडिलांनी तिला कशापद्धतीने आधार दिला, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली. आदितीने नुकतंच ‘झूम’या इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने हा खुलासा केला. अनेक बॉलिवूड वेबसीरीज आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली आदिती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
आदिती पोहनकरने ‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक हृदयद्रावक प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, “जेव्हा मी ‘आश्रम ३’ या वेब सीरिजची शूटिंग करत होते, त्याचवेळी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझ्यासाठी तो फार वाईट काळ होता. रिल लाइफमध्ये तुम्ही भावनांचं चित्रण करता आणि एक शॉट संपताच मूव्ह ऑन होता. परंतु रियल लाइफमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचं समतोल राखणं सोपं नसतं. या सर्व गोष्टींबद्दल मी शिकत गेले. ‘आश्रम’ वेबसीरीज माझ्यासाठी खूप खास आहे कारण, माझ्या वडिलांनी त्याचं शूटिंग सुरू ठेवण्यासाठी खूप प्रोत्साहन आणि हिंमत दिली होती.”
फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser
मुलाखती दरम्यान आदिती म्हणाली की, “मला माझे वडिल म्हणाले होते की, माझ्याकडे परत येऊ नकोस. कारण मला त्याने आनंद मिळणार नाही आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणेच मी केलं होतं. वडिलांनी जसं सांगितलं, तसंच मी केलं. याच गोष्टीने मला आणखी सक्षम बनवलंय. त्यावेळी मी भावनिकदृष्ट्या खचले होते, पण माझे वडील माझ्यासाठी फार खंबीर होते. त्यांना त्यांचा अखेरचा क्षण कधी येणार हे माहित होतं, आणि त्या अवस्थेतही ते माझ्यासोबत बोलत होते. माझ्या आईसाठी मी या गोष्टीचा वापर ताकदीच्या रुपात केला. जेणेकरून आईसुद्धा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहिल.” आदिती पोखनकरची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्या धैर्याचं कौतुक केलं जात आहे.
या मुलाखतीत अदितीने अलीकडेच घडलेल्या एका घटनेबद्दल सांगितले. ज्यामध्ये अभिनेत्री जखमी झाली होती. “मी काही दिवसांपूर्वी एका वेब सीरिजची शूटिंग करत होते. ती अद्याप रिलीज झाली नसून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या सीरिजमधील ॲक्शन सीन शूट करताना मला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही मी माझं शूटिंग पूर्ण केलं. कलाकाराचं आयुष्य इतकं सोपं नसतं. एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याला बरा होण्यासाठी वेळ दिला जातो. परंतु एखाद्या मोठ्या सेटवर अनेक लोक तुमच्या प्रतीक्षेत असता. तेव्हापासून मी माझी अधिक काळजी घेऊ लागले आहे”, असं तिने स्पष्ट केलं.