फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पंचायत’ वेबसीरीज ही ओटीटी विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरीज पैकी एक आहे. या वेबसीरीजने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं असून आतापर्यंत या वेबसीरीजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘पंचायत’चा चौथा सीझन येणार आहे. नुकताच ‘वेव्हज समिट २०२५’मध्ये, ‘पंचायत’ वेबसीरीजच्या चौथ्या सीझनचा टीझर रिलीज करत घोषणा करण्यात आली आहे. टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून टीझरची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
आमिर खान लवकरच घेऊन येणार Sitaare Zameen Par चा ट्रेलर? शेअर केलेल्या पोस्टने उडाली खळबळ
“फुलेरा गावात लवकरच निवडणूकीची रणधुमाळी सुरु होणार आहे…” असं कॅप्शन देत प्राईम व्हिडिओच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत पेजवर टीझर रिलीज करण्यात आला आहे. ‘पंचायत’ वेबसीरीजचा चौथा सीझन येत्या २ जुलैपासून प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे. टीझरबद्दल बोलायचे तर, फुलेरा गावात यावेळी निवडणुका होणार आहेत. प्रधान पदासाठी भूषण आणि रिंकूचे वडील (सध्याचे प्रधान) यांच्यामध्ये कमालीची रस्सीखेच पाहायला मिळेल. रिंकीची मम्मी म्हणजेच मंजू देवी आणि भूषणची पत्नी क्रांती देवी प्रधान होण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे.
फुलेरामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मंजू देवीचं लॉकी हे चिन्ह आहे. तर क्रांती देवी कुकर प्रेशरच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. गावचा प्रधान कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना सीरीज रिलीज झाल्यानंतरच मिळेल. ‘पंचायत ४’च्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ‘पंचायत ४’ मध्ये, तुम्हाला जुन्या पात्रांना त्याच भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. या टीझरच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांच्या कमेंट्सचा पूर पाहिला मिळतोय. दरम्यान, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या ‘पंचायत’ या वेब सीरिजला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त निर्मात्यांनी ‘पंचायत ४’ची घोषणा केली आहे.
‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने घेतली आलिशान कार! Video शेअर करत दाखवली नव्या कारची झलक
दरम्यान, २०२०मध्ये ‘पंचायत’ वेब सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. दुसरा सीझन २०२२ मध्ये तर तिसरा सीझन गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर यांच्या मुख्य भूमिका आहेत. २ जुलै रोजी ‘पंचायत ४’ ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.