चिखलात अडकलेल्या चिमुरडीसाठी दिशा पाटनीची बहीण बनली देवदूत, बेवारस मुलीचे वाचवले प्राण
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी दिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दिशा पाटनीची बहिण खुशबू पाटनी ही माजी लष्करी अधिकारी आहे. अलीकडेच, दिशाची बहिण खुशबू हिने असं काही केलं आहे, ज्यामुळे तिचं खूप कौतुक होत आहे. दरम्यान, खुशबू पाटनीने एका चिखलात अडकलेल्या चिमुरडीचा जीव वाचवला आहे. खुशबू पाटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ स्वत: शेअर केलेला आहे, तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी कौतुक करीत आहे.
खुशबूने बरेलीमध्ये एका चिमुरडीचा जीव वाचवला आहे, त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खुशबूच्या घराच्या मागे एक पडिक जागेत कोणीतरी त्या लहान मुलीला सोडून गेल्याचं खुशबूनं सांगितलं. पाटनी कुटुंबाने चिमुरडीला बरेली पोलिसांच्या स्वाधीन केलं असून तिचं नाव राधा असं ठेवलं आहे. दरम्यान, खुशबू पाटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी चिखलात अडकलेली दिसत असून ती रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये खुशबू म्हणते की, “माझ्या घराच्या पाठीमागे एक मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेमध्ये या चिमुरडीला कोणीतरी सोडून गेलं होतं.” त्यानंतर, ती बाळावर प्रेम करताना दिसत आहे. त्या मुलीच्या कपड्यांवरील घाण साफ करते आणि तिला उचलून घेऊन जाते. खुशबू बाळाला दूध पाजते आणि तिला पुढे पोलिसांच्या स्वाधीनही तिने केलं.
व्हिडिओच्या शेवटी खुशबूने सांगितलं की, बाळाच्या रडण्याचा आवाज माझ्या आईला सर्वात आधी ऐकू आला. त्यानंतर तिची आई आणि त्यांची घरातील कामवाली बाई दोघी घराच्या मागील भागात गेले. तितक्यात तिकडे खुशबूही गेली. त्यानंतर तिने खुशबूने तिला आपल्या ताब्यात घेतले. मुलीचा चेहरा दाखवताना खुशबू म्हणाली, ‘जर ही मुलगी बरेलीची असेल आणि ही तुमच्या कोणाच्या ओळखीत मुलगी असेल तर आम्हाला सांगा की तिचे आईवडील तिला इथल्या विचित्र जागेमध्ये कसे सोडून गेले. मला अशा पालकांची लाज वाटते.” खुशबू मुलीच्या चेहऱ्यावरील जखमा देखील दाखवतेय आणि त्यानंतर ती तिला बरेली पोलिसांच्या स्वाधीन करते. ती म्हणते की, आधी तिच्यावर उपचार केले जातील आणि नंतर पुढील कारवाई केली जाईल. दिशा पाटनीच्या बहिणीने पुढे सांगितलं की, तिने मुलीला पाहताच तिचं नाव राधा ठेवलं. ती बाळाचा मागोवा घेत राहील आणि तिच्या चाहत्यांसह पुढील माहिती शेअर करेल.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या गोंडस लेकीचं बारसं, नाव ठेवलंय खास…
या व्हिडिओसोबत खुशबूने एक लांबलचक कॅप्शन लिहिलं – ‘ज्याचं परमेश्वर रक्षण करतो, त्याला कोणीही हानी पोहोचवू शकत नाही. मला आशा आहे की अधिकारी तिची काळजी घेतील आणि पुढे जे काही ऑर्डर सिरीज असतील ते योग्य नियम आणि कायद्यांसह अंमलात आणले जातील.’ खुशबूने पोस्टमध्ये बरेली पोलिस, यूपी पोलिस, मुख्यमंत्री योगी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, पंतप्रधान मोदी आणि महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना टॅग केलं आहे. खुशबूने पुढे म्हटलं आहे की, ‘कृपया आपल्या देशातील मुलींना वाचवा!’ हे सगळं किती काळ चालणार? तिला योग्य लोकांच्या स्वाधिन केलं आहे. योग्य लोकांच्या हातात तिचं आयुष्य गेल्यामुळे नक्कीच तिचं जीवन समृद्ध होईल, याची मी खात्री करेन. एखाद्याच्या नशिबात जे घडतं ते चांगलंच असतं. ते कोणीही बदलू शकत नाही. हे कृष्णा.’ दरम्यान, खुशबूच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटींकडूनही तिचं कौतुक केलं आहे.
दिशा पाटनीच्या बहिणीबद्दल सांगायचे तर, तिच्या बहिणीचं नाव खुशबू पाटनी आहे. ती पेशाने माजी लष्करी अधिकारी आहे. दिशाप्रमाणेच खूशबू सुद्धा सुंदर आणि फीट दिसतेय. अनेकदा दिशाच्या व्हिडिओ, फोटोमध्ये तिची झलक दिसते. तिने डेहराडूनच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं आहे.