Actress Rakul Preet Singh Perform Aalech Mi Lavni Song
आपल्या बिनधास्त आणि बोल्ड भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या लावणीमुळे चर्चेत आहे. मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन सई ताम्हणकरने केलं आहे. सध्या सई ताम्हणकर तेजस देवस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटातील तिच्या लावणीमुळे चर्चेत आली आहे. तिने या चित्रपटात ‘आलेच मी’ गाण्यावर जबरदस्त लावणी केली आहे. सईने पहिल्यांदाच सादर केलेल्या लावणीची फक्त मराठी इंडस्ट्रीलाच नाही तर, बॉलिवूड इंडस्ट्रीलाही भुरळ पडलीये. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीवर रिल बनवली आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतच्या गोंडस लेकीचं बारसं, नाव ठेवलंय खास…
मराठी अभिनेत्रींना सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ लावणीची भुरळ पडत असताना आता बॉलिवूड अभिनेत्रीलाही भुरळ पडतेय. “जेव्हा एखादं गाणे आपल्या डोक्यातून जात नाही; तेव्हा असंच काहीसं घडतं…” असं कॅप्शन देत रकुलने ‘आलेच मी’ लावणी शेअर केलेली आहे. रकुलचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रकुलने पहिल्यांदाच लावणीच्या काही मोजक्या स्टेप्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवलेय. रकुलच्या व्हिडिओला सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांत चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही रकुलच्या डान्सचे कौतुक केले.
“डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…”, सचिन खेडेकरांच्या ‘भूमिका’ नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट
रकुलने मराठी गाण्यावर रील बनवल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केलेय. मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून आपली खास ओळख निर्माण करणाऱ्या बेला शेंडेचा दमदार आवाज ‘आलेच मी’ या लावणीला लाभला असून गायक रोहन प्रधानने तिला साथ दिली आहे. संगीतकार रोहन- रोहन यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने या गाण्याची नृत्यरचना केली आहे. सईने केलेली लावणी ‘देवमाणूस’ या चित्रपटातील आहे. ‘आलेच मी’ लावणीबद्दल सईने सांगितलं की, ” ‘देवमाणूस’ चित्रपटातील ‘आलेच मी’ लावणीसाठी मी ३३ तास सराव केला आहे. खरंतर, लावणी करणं हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता. हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली. आशिषच्या मार्गदर्शनाशिवाय इतकी प्रभावी लावणी साकारता आलीच नसती. लव फिल्म्स आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याबद्दल मी खूप आभारी आहे.”