करोडो रुपयांची मालकीण आहे, करिश्मा कपूर, 'या' ७ पद्धतीने कमावते पैसा
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर कमालीची चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिचे एक्स हजबेंड आणि सुप्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्री आपल्या दोन्हीही मुलांसोबत ती पोहोचली होती. अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना अभिनेत्री आणि तिच्या मुलांबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या चाहते करिश्मा कपूरच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
ईशा गुप्ता हार्दिक पांड्याला करत होती डेट? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली ‘आम्ही दोघेही…’
NDTV आणि Celebrity Net Worth सारख्या वेबसाइट्स नुसार, २०२५ मध्ये करिश्मा कपूरची एकूण संपत्ती सुमारे १२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १०० कोटी रुपये) इतकी आहे. इतरत्र अहवालांमध्ये, हा आकडा १२० कोटी रुपये पर्यंत सांगितला जात आहे. ९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली करिश्मा कपूर अजूनही अधूनमधून चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिने २०२० मध्ये ‘मेंटल हूड’ वेब सीरीजमध्ये तर, २०२४ मध्ये ‘मर्डर मुबारक’ चित्रपटामध्ये काम केले. याशिवाय तिची २०२५ मध्ये, ‘डायनिंग विथ द कपूर्स’ नावाची ही नवीकोरी वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तमन्ना भाटियाच्या ब्रेकअपनंतर विजय वर्मा ‘दंगल’ अभिनेत्रीला करतोय डेट? Viral Video ने उडाली खळबळ
मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये इतकं मानधन घेते. करिश्मा कपूरच्या उत्पन्नाचा अनेक हिस्सा ब्रँड अँडोर्समेंटमधून येतो. २०२५ मध्ये, करिश्मा ‘ऑलिव्ह’ ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली होती. त्यानंतर अभिनेत्रीने स्वयंपाकाचे तेल आणि पास्ता प्रॉडक्ट्सचे प्रमोशन केले होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सामान्यतः ब्रँड अँडोर्समेंटसाठी २० लाख ते ३० लाख रुपये आकारतात. करिश्मा कपूरने अभिनय करियरसोबतच अनेक बिझनेस वेंचर्समध्येही गुंतवणूक केली आहे. यॉर स्टोरीच्या अहवालानुसार, करिश्माने ‘बेबीओय. कॉम’ मध्ये सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे, जी बेबी आणि मॅटर्निटी प्रॉडक्ट्सचे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीत तिचा २६% हिस्सा आहे, ज्यामुळे तिला चांगला नफा मिळतो.
बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ पुन्हा इंडस्ट्रीवर करणार कब्जा, गोविंदाने नव्या चित्रपटाची केली घोषणा
करिश्मा कपूरने रिअल इस्टेटमध्येही मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, तिने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ‘ग्रँडबे’ नावाची एक व्यावसायिक जागा कोंग्सबर्ग मेरीटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला दोन वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. याशिवाय, तिने आणि तिची आई बबिता कपूरने वांद्रे पश्चिम येथील एका शोरूमची जागा एका ज्वेलरी ब्रँडला दरमहा ६ लाख रुपयांना भाड्याने दिली आहे. तर, करिश्मा कपूरने २०१३ मध्ये ‘माय यमी मम्मी गाइडः फ्रॉम गेटिंग प्रेग्नंट टू लूजिंग ऑल द वेट अँड बियॉन्ड’ नावाचं पुस्तक लिहिलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संजय कपूर यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर्स (सुमारे १०,३०० कोटी रुपये) होती. त्यांनी त्यांच्या आणि करिश्मा कपूर यांच्या मुलांसाठी समायरा आणि कियानसाठी १४ कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते, ज्यावर दरवर्षी १० लाख रुपये व्याज मिळते.