(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. आता ईशा गुप्ता हिने त्या दिवसांची आठवण करून दिली आहे जेव्हा तिच्या आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या डेटिंगच्या बातम्या बी-टाउनमध्ये चर्चेचा विषय बनल्या होत्या. एकेकाळी या दोघांच्या अफेअरची खूप चर्चा होती. तथापि, दोन्ही सेलिब्रिटींपैकी कोणीही यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही. आता बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री ईशा गुप्ता यावर बोलली आणि डेटिंगच्या बातम्यांचे सत्य उघड केले आहे. अभिनेत्री नक्की काय म्हणाली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ पुन्हा इंडस्ट्रीवर करणार कब्जा, गोविंदाने नव्या चित्रपटाची केली घोषणा
‘आम्ही काही महिने बोलत होतो’ – ईशा गुप्ता
सिद्धार्थ कन्ननशी झालेल्या संभाषणात, ईशा गुप्ताने तिच्या डेटिंगच्या बातम्या आणि हार्दिक पंड्यासोबतच्या अफेअरबद्दल मोकळेपणाने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, ‘हो, आम्ही काही दिवस एकमेकांसह बोलत होतो. मला वाटत नाही की आम्ही डेटिंग करत होतो. पण हो, आम्ही काही महिने बोलत होतो. आम्ही ‘कदाचित ते होईल, कदाचित ते होणार नाही’ अशा टप्प्यावर होतो. डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच ते संपले. म्हणून ते डेटिंग नव्हते. आम्ही एक-दोनदा भेटलो, एवढेच. मी म्हटल्याप्रमाणे, ते काही महिने होते आणि नंतर ते संपले.’ असे अभिनेत्री म्हणाली आहे. २०१८ मध्ये ईशा गुप्ताचे नाव हार्दिक पंड्यासोबत जोडले गेले आणि दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.
‘आम्ही दोघेही एकमेकांपासून वेगळे होतो’
पुढे अभिनेत्री म्हणाली की, आम्ही एक कपल असू शकलो असतो, पण मला वाटत नाही की ते घडणे नशिबात होते. हार्दिक आणि मी एक चपल असावे तितके सुसंगत नव्हतो. तसेच प्रत्येकाचा स्वभाग वेगळा असतो. मी दररोज सकाळी स्वतःच्या मनासारखे उठू शकत नाही. मी दररोज सकाळी अरे देवा, आम्ही दोघेही किती चांगले दिसतो किंवा स्वतःची स्तुती करत उठू शकत नाही. मला हे अजिबात सहन होत नाही.’ असे अभिनेत्री म्हणाली आहे.
तमन्ना भाटियाच्या ब्रेकअपनंतर विजय वर्मा ‘दंगल’ अभिनेत्रीला करतोय डेट? Viral Video ने उडाली खळबळ
ईशा गुप्ता ‘धमाल ४’ मध्ये दिसणार आहे
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ईशा गुप्ता शेवटची बॉबी देओलच्या ‘आश्रम’ मालिकेत दिसली होती. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दरम्यान, ती काही म्युझिक व्हिडिओंमध्ये नक्कीच दिसली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, ती अजय देवगणसोबत ‘धमाल ४’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.