Farah Khan Birthday: बॅकडान्सर ते कोरियोग्राफर; फराह खानचा बॉलिवूडमधील खडतर प्रवास
बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिक, डान्सर आणि नृत्यदिग्दर्शका म्हणून फराह खानची ओळख आहे. अवघ्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणाऱ्या फराह खान यांचा आज वाढदिवस आहे. फराह खान यांचा जन्म ९ जानेवारी १९६५ साली झाला आहे. त्या आज आपला ६० वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. फराह खान यांची प्रमुख ओळख नृत्यदिग्दर्शिका आहे. त्यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये २०० हून अधिक गाण्यांची कोरियोग्राफी केलीये. या बहुआयामी फरान खानचा इथपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
हर्षवर्धन वावरेच्या आवाजाने गावरान प्रेम गीत सजलं, शेअर केला गाण्याचा अनुभव
फराह खानच्या वडीलांचे नाव कम्रान खान आहे. कम्रान खान हे बी- ग्रेड चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. फराहच्या बालपणी त्यांनी ‘ऐसा भी होता है’ या ए-ग्रेड चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी केलेला हा प्रयत्न त्यांचा सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. त्यानंतर फरहाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला. तेव्हापासूनच त्यांच्या संघर्षाचे दिवस सुरु झाले. फराहने ‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वत:च्या करियरवर भाष्य केलं होतं.
ती म्हणाली होती की, मी आणि माझे कुटुंबीय आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये खूप गरिब होते. खरंतर, वडिलांचा चित्रपट संपूर्ण फ्लॉप गेल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती फार नाजूक झाली होती. आमच्याकडे कायमच पैशांची कमतरता असल्यामुळे त्याच्या विचाराने वडिलांनी दारु प्यायला सुरुवात केली होती. मी १८ वर्षांची असताना माझ्या वडिलांना गमावले होतं. तेव्हापासून आमच्या फॅमिलीची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यामुळे मी, भाऊ साजिद आणि आई आम्ही सर्वच कामाला जाऊन घरखर्चाला हातभार लावायचो.
सोशल मीडियावरचे प्रेम, पण खऱ्या प्रेमाचे मात्र ब्रेकअप; ‘लेट्स मीट’मधून उलगडणार कोडं
मुलाखतीत अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, वडिलांच्या निधनानंतर माझ्यावरच संपूर्ण घराची जबाबदारी होती. त्यामुळे मी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करु लागले. डान्स करता करता मी कलाकारांनाही अनेकदा डान्स स्टेप्स शिकवायचे. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत असताना १९९३ मध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी मध्येच बंद केली. त्यानंतर मला ‘पहला नशा’ ह्या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर शाहरुख खानच्या चित्रपटातील ‘कभी हा कभी ना’ ह्या गाण्याची कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली.”
शाहरुखला ती ‘कभी हा कभी ना’च्या सेटवर भेटली आणि दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘कभी हा कभी ना नंतर शाहरुख खान आणि फराह खान यांची जोडी बॉलिवूडमध्ये चांगलीच गाजली. शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांसाठी फराह खानने कोरिओग्राफर म्हणून काम केले. तिने कोरिओग्राफ केलेले काही प्रमुख चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘विरासत’, ‘दिल तो पागल है’, ‘दिल से’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कहो ना प्यार है’, ‘कभी खुशी कभी गम’… केवळ शाहरुखच नव्हे, तर अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींना फराह खानने आपल्या तालावर नाचवले आहे.
‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंग रुग्णालयात दाखल, व्हिडिओ शेअर करत केला खुलासा