भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'जिगरा'चा टीझर रिलीज, स्टंट्स अन् अॅक्शन बरंच काही...
Alia Bhatt and Vedang Raina’s Jigra Teaser : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’नंतर आता आलिया लवकरच एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाच्या ‘जिगरी’ चित्रपटाची घोषणा करत रिलीज डेट जाहीर केली होती. आता त्यानंतर या बहुचर्चित चित्रपटाचा आता टीझर रिलीज करण्यात आला आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर या टीझरमध्ये अगदी उत्कृष्ट रित्या भाष्य करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा – ‘फिरवलं फिरवलं लिंबू…’, अमेय वाघसोबत थिरकणार गौतमी पाटील; पाहा Video
आलिया भट्टसोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत ‘आर्चिज’ फेम वेदांग रैना सुद्धा दिसणार आहे. आलिया बहिणीच्या भूमिकेत असून वेदांग भावाच्या भूमिकेत आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘जिगरी’चा टीझर शेअर केला आहे. टीझरबद्दल सांगायचे तर, समोर बसलेल्या एका व्यक्तीला आलिया तिच्या लाईफची स्टोरी सांगताना दिसते. तिच्या लाईफची स्टोरी मोठी आणि तितकीच खडतर असते. चित्रपटामध्ये तिला आई आणि वडील दोघेही नसतात आणि तिच्या भावाकडे फार कमी वेळ असतो. पण तो जेलमध्ये आहे, असं ती टीझरमध्ये सांगते.
मग टीझरमध्ये, ‘एक हजारों मैं मेरी बहना हैं’ हे गाणं लागतं. या गाण्यासोबतच भावाचे आणि बहिणीचे सुंदर क्षण दाखवले आहे. भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर सुंदर भाष्य करणाऱ्या ह्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय. आलियाचं चित्रपटामध्ये घाबरलेलं आणि कमजोर पात्र दिसतंय. खरंतर, तिच्या भावाला परदेशामध्ये तिथल्या बॉर्डरवर कुठल्यातरी कारणास्तव अटक झालेली असते. आपल्या भावाला वाचवण्यासाठी आलिया काहीही करू शकते, असं टीझरमध्ये दिसतंय. आलियाला भावाला परदेशातून सोडून आणण्यासाठी तिला काय काय करावं लागतं, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
सध्या तरी टीझरने प्रेक्षकांचे मन जिंकले असून आलिया आणि वेदांगचा हा मोस्ट अवेटेड चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं असून आलिया आणि करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’नंतर अभिनेत्रीने ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केले. ‘जिगरी’नंतर आलिया यशराज सिनेमाच्या ‘स्पायवर्स’मधील आगामी ‘अल्फा’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.