Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; ‘महावतार युनिव्हर्स’ची भव्यदिव्य घोषणा

भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित ७ भव्यदिव्य चित्रपटांच्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांच्या महत्त्वाकांक्षी ॲनिमेटेड फ्रँचायझीच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करण्यात आली

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 25, 2025 | 07:43 PM
७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; 'महावतार युनिव्हर्स'ची भव्यदिव्य घोषणा

७ चित्रपट, १ विश्व, अगणित कथा; 'महावतार युनिव्हर्स'ची भव्यदिव्य घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित ७ भव्यदिव्य चित्रपटांच्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांच्या महत्त्वाकांक्षी ॲनिमेटेड फ्रँचायझीच्या माध्यमातून चित्रपटाची घोषणा करण्यात आली. लवकरच ही फ्रेंचायझी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या फ्रेंचायझीची काही तासांपूर्वीच घोषणा करण्यात आली आहे.

होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ॲनिमेटेड फ्रँचायझीनध्ये ‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरेवर आधारित ही ॲनिमेटेड सीरीज भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित असणार आहे. पुढील अनेक वर्षे ‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’ ही चित्रपट सीरीज ७ भागांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वय केवळ आकडा! ‘गाडी नंबर १७६०’मध्ये सुहास जोशींनी साकारले ॲक्शन सीन्स

‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची सुरुवात या वर्षापासून म्हणजेच २०२५ या वर्षापासून होणार आहे. या वर्षी ‘महावतार नरसिंह’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा या युनिव्हर्समधला पहिला चित्रपट आहे. तर, ‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा शेवट २०३७ मध्ये होणार आहे. ‘महावतार कल्कि- भाग २’ या चित्रपटाने ‘महावतार युनिव्हर्स’ची सांगता होणार आहे. कोणकोणते चित्रपट कोणत्या कोणत्या वर्षी रिलीज होणार आहेत, याचं अधिकृत रिलीज कॅलेंडर खालीलप्रमाणे आहे….

★ महावतार नरसिंह – २०२५
★ महावतार परशुराम– २०२७
★ महावतार रघुनंदन– २०२९
★ महावतार द्वारकाधीश– २०३१
★ महावतार गोकुलानंद – २०३३
★ महावतार कल्कि – भाग १ – २०३५
★ महावतार कल्कि – भाग २ – २०३७

 

‘महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’ केवळ चित्रपटांपुरते मर्यादित न राहता, कॉमिक्स, डिजिटल कथा, व्हिडीओ गेम्स आणि विशेष संग्रहणीय वस्तूंच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून देण्यात येईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भारताच्या अध्यात्मिक वारशाशी नव्याने जोडण्यासाठी एक व्यापक भावविश्व तयार करण्यात येणार आहे. जे आजच्या पिढीलाही आवडेल आणि आपली परंपरा नव्या पद्धतीने सादर करेल. ‘महावतार नरसिंह’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार करत असून, क्लीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

इंदू-अधूच्या संसारात नवं संकट? गोपाळच्या परत येण्याने ‘इंद्रायणी’ मालिकेत येणार मोठा ट्वीस्ट

होम्बले फिल्म्स यांच्यासोबतच्या सहकार्याने हा चित्रपट एक भव्य दृश्य अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संस्कृतीची गूढता, दमदार व्हिज्युअल्स, भावस्पर्शी कथा आणि उत्कृष्ट निर्मितीमूल्यांसह हा चित्रपट ५ भारतीय भाषांमध्ये आणि 3D फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होईल. ‘महावतार नरसिंह’ ही केवळ एक फिल्म नाही, तर ती आजच्या पिढीला आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडणारी एक जिवंत अनुभूती असेल. या चित्रपटाचे प्रदर्शन २५ जुलै २०२५ ला होईल.

Web Title: Bollywood new multiverse mahavtar cinematic universe 7 films countless stories of lord vishnu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News

संबंधित बातम्या

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”
1

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
2

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

De De Pyaar De 2  Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही
3

De De Pyaar De 2 Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल
4

मोठी बातमी! बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.