‘बिग बॉस ओटीटी २’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, भावुक पोस्ट करत मागितली माफी
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. टिव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आशिका भाटिया हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आशिका भाटियाचे वडील राकेश भाटिया यांचे निधन झाले आहे. आशिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत वडिलांच्या निधनाचे वृत्त चाहत्यांना दिले आहे.
इन्स्टा स्टोरीवर आशिकाने तिच्या वडिलांसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, “बाबा मला माफ करा… मी तुमच्यावर खूपवर प्रेम करते… भावपूर्ण श्रद्धांजली…” सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिका भाटिया आपल्या आई- वडिलांसोबत सुरतमध्ये राहते. तिच्या वडिलांचे निधन २५ नोव्हेंबरला सुरतमध्ये झाले आहे. वडिलांच्या अचानक जाण्याने आशिकासह तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.
‘पुष्पा 2’ चे किसिक गाणे रिलीज होताच श्रीलीला झाली ट्रोल? चाहत्यांना आली सामंथाची आठवण!
आशिका लहान असल्यापासूनच तिचे वडील राकेश भाटिया आणि तिची आई मीनू भाटिया एकमेकांपासून वेगळे राहत आहे. आशिका तिच्या आईसोबत मुंबईत राहते आणि तिचे वडील सुरतमध्ये व्यवसाय सांभाळत होते. आशिकाच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर तिच्या वडिलांसोबत कोणताही फोटो नाही. बिग बॉस ओटीटी २ मध्ये असतानाही आशिकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही सांगितले नाही. आशिकाच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिकाच्या चाहत्यांकडून आणि तिच्या मित्र मंडळींकडून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दरम्यान, आशिका भाटियाच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे तर, आशिकाने फार लहान वयातच फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. तिने सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात तिने सलमानच्या छोट्या बहिणीची भूमिका निभावली होती. या चित्रपटामध्ये आशिकाने सलमान खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि अनुपम खेर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटामुळेच आशिकाला फार मोठी प्रसिद्धी मिळाली. आशिकाने ‘मीरा’ मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती.
अनिल कपूरमुळे नाना पाटेकर यांच्या हातातून निसटली ‘परिंदा’मधली भूमिका, अभिनेत्याला व्यक्त केली खंत
त्यानंतर ‘सोनी टीव्ही’वरील ‘परवरिश कुछ खट्टी कुछ मीठी’मध्ये आशिका झळकली. या मालिकेत तिने गिन्नीची भूमिका साकारली होती. लोकप्रिय झाल्यानंतर आशिका ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वात तिने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. आशिका आपल्या अभिनयाबरोबर हॉटनेस आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आशिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. ६.४ मिलियन पेक्षा अधिक तिने फॉलोवर्स आहेत.