शाहरुख खानला कोणत्या नावाने इतर सेलिब्रिटी चिडवायचे, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा...
बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. शाहरुख खानने आपल्या तीन दशकांच्या फिल्मी करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या चित्रपटांमधील अनेक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं आहे. गाजलेल्या गाण्यांमधील अभिनेता आणि गायकाच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पसंदी दिली आहे.
शाहरुख खान आणि अभिजीत भट्टाचार्य या जोडीने इंडस्ट्रीला अनेक हिट गाणी दिली आहेत. पण मध्यंतरी गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखसाठी गाणे बंद केले होते. त्यांनी यावर खुलासा केला होता. त्यानंतर काही दिवसांनी प्रसिद्ध गायिका दुआ लिपाने तिच्या ‘लेव्हिटेटिंग’ गाण्यासह शाहरुख खानच्या ‘बादशाह’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘वो लड़की जो’ चे फॅन-मेड मॅशअप गाणे गायले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
बॉलिवूड अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी; भोपाळची ‘ही’ तरुणी तुम्हाला माहितेय का ?
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानचं नाव घेत गाण्याच्या श्रेयवादावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “एक काळ असा होता की, मी शाहरुख खानसाठी अनेक हिट गाणी गायली आहेत. पण नंतर काही कारणांमुळे आम्ही दोघांनीही १७ वर्षांपासून एकत्र काम केलेले नाही. मी गाण्यांसाठी खूप निवडक होतो. मी फक्त शाहरुखसाठीच गाईन, इतर कोणासाठीही गाणार नाही. असं ठरवलं होतं. पण यामुळे मला काही समस्या निर्माण झाल्या. किंग खानचे काही सेलिब्रिटी फ्रेंड्स त्याला ‘तोतऱ्या’ (हकला) म्हणून चिडवायचे.”
२०२४ मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटी कपलने घेतला घटस्फोट; वाचा यादी…
अभिजीत यांनी पुढे सांगितले, “दुबईतल्या एका पुरस्कार सोहळ्यात मला ‘तुम्हे जो मैंने देखा’ या गाण्यासाठी पुरस्कार मिळाला होता. स्टेजवरून खाली उतरत असताना, एका अभिनेत्याने मला टोकलं आणि म्हणाला, ‘अरे! तू तोतऱ्यासाठी का गातोयस?’ हे विधान एकाने नाही तर दोघांनी केलं. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांनी हे असं का म्हणावं? मला गाण्यासाठी पुरस्कार मिळालाय, त्यात हे असं का वाटावं? पण त्या घटनेनंतर माझा पार्श्वगायनातला रस कमी झाला. मी माझे शोज् आणि कॉन्सर्टवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. आजही मी त्यात आनंदी आहे.” अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुखच्या चित्रपटांसाठी अनेक हिट गाणी दिली आहेत, यात ‘तुमने जो मैंने देखा’(मैं हूँ ना), ‘तौबा तुम्हारे इशारे’ (चलते चलते), ‘चाँद तारे’(यस बॉस), आणि ‘जरा सा झूम लूं मैं’(दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे) यांचा समावेश आहे.