२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. २०२५ या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटी काही नवीन गोष्टींचा श्री गणेशा करत सुरूवात करणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीसह क्रिकेट जगतात यंदा बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या बातम्याही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या. अनेक सेलिब्रिटींनी या वर्षी विवाह केला, तर काहींनी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. जाणून घेऊया २०२४ या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे.
Celebrity Divorces 2024 Shocking Splits in Bollywood And Cricket
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक २०२४ वर्षाच्या सुरुवातीलाच भारताची लोकप्रिय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी चाहत्यांना घटस्फोटाची माहिती दिली. सानिया आणि शोएब गेल्या २ वर्षांपासून वेगळे राहत होते. त्यांनी जानेवारीमध्ये घटस्फोटाची अधिकृत माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार, विवाहबाह्य संबंध असल्यामुळे सानिया आणि शोएबने एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. घटस्फोट घेतल्यानंतर काही काळाने शोएबने पाकिस्तानी मॉडेलशी विवाह केला आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी ईशा देओलने उद्योजक भारत ताखर यांच्याशी विवाह केला होता. मात्र, आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये घटस्फोटाची बातमी देऊन चाहत्यांना धक्का दिला आहे. लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला आहे. ईशाकडून पर्सनल स्पेस न मिळाल्यामुळे भरत तख्तानी यांनी घटस्फोट घेतल्याची माहिती आहे.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोव्हिक २०२४ च्या आयपीएल सामन्यांदरम्यान हार्दिक आणि नताशा यांच्यातील नात्याची बरीच चर्चा रंगली. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिक आणि नताशाने जुलैमध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. हार्दिक पांड्या आणि नताशाने जानेवारी २०२० एंगेजमेंट केली होती. या निमित्त त्यांनी जंगी पार्टी दिली होती. त्यानंतर त्यांनी मे २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. विवाहानंतर त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. पण त्यांचा संसार अधिक काळ टिकू शकला नाही.
Saira Bano and AR Rahman Photos
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत तमिळ सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी घटस्फोट घेतला आहे. २००४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. २० वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या २० वर्षानंतर नातेसंबंध संपुष्टात येण्याचे कारण धनुष असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबाला वेळ न दिल्याने धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडणे होत होती, म्हणून त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
दलजीत आणि निखिल पटेल हिंदी टेलिव्हिजन स्टार दलजीत कौर आणि निखिल पटेल यांनी 2024 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करून आपलीच बाजू कशी योग्य आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
malaika arora and arjun kapoor relationship know how it started