Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोहरा’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने बॉडी डमीशिवाय केले होते खतरनाक स्टंट्स

1994 मध्ये प्रदर्शित झालेला मोहरा हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स एकत्र दिसले होते. हा चित्रपट लोकांना खूप आवडला आणि बॉक्स ऑफिसवर तो ब्लॉकबस्टर सुद्धा ठरला. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाशी संबंधित न ऐकलेल्या कथा जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 02, 2024 | 05:28 PM
‘मोहरा’ या चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने बॉडी डमीशिवाय केले होते खतरनाक स्टंट्स
Follow Us
Close
Follow Us:

1 जुलै 1994 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडाली. हा चित्रपट दुसरा कोणी नसून राजीव राय दिग्दर्शित ‘मोहरा’ होता. नसीरुद्दीन शाह, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि परेश रावल यांच्यासह अनेक कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता.

रवीनाच्या आधी या अभिनेत्रींना ऑफर्स आल्या 
मोहरा हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये प्रेक्षकांना क्राइम, ड्रामा, थ्रिलर, मिस्ट्री, रोमान्स आणि ॲक्शन पूर्णपणे पाहायला मिळाले. राजीव राय यांनी हा चित्रपट श्रीदेवीला पहिल्यांदा ऑफर केला होता, पण तिने तो नाकारला, कारण त्यावेळी ती चंद्रमुखीमध्ये व्यस्त होती. त्यानंतर दिग्दर्शकाने दिव्या भारतीला विचारले आणि तिने या चित्रपटाला होकार दिला.

या चित्रपटाचे थोडेसे चित्रीकरणही झाले होते, परंतु या नंतर अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला आणि चित्रपट थांबला. दिग्दर्शकाने ऐश्वर्या राय बच्चनचाही विचार केला, पण ती मिस वर्ल्ड स्पर्धेत व्यस्त होती. मग शेवटी हा चित्रपट रवीना टंडनच्या नशिबी आला आणि या चित्रपटाने अभिनेत्रीचे नशीबच बदलले.

चित्रपट बनवण्याची कल्पना जिममध्ये सुचली
IMDb च्या रिपोर्टनुसार, निर्माता गुलशन राय आणि लेखक शब्बीर बॉक्सवाला सुनील शेट्टीच्या जिममध्ये जायचे. एके दिवशी व्यायामादरम्यान शब्बीर बॉक्सवालाच्या मनात एक प्लॉट आला आणि त्याने गुलशन राय यांना सांगितले. तिथून पुढे त्याने मोहराची कथा ॲक्शनपॅक्ड थ्रिलर म्हणून पूर्ण करायला सुरुवात केली.

कोणत्याही बॉडी डबलशिवाय स्टंट केले
अक्षय कुमारला त्याचे चाहते खिलाडी कुमार असेही म्हणतात आणि यामागे एक खास कारण आहे. कलाकार चित्रपटांमध्ये दमदार ॲक्शन करताना दिसला होता. काही चित्रपटांमध्येही त्याने बॉडी डमीशिवाय सीन केले आहेत आणि मोहरा त्यापैकी एक आहे. या चित्रपटात अक्षयने क्लायमॅक्समध्ये 100 फूट उंच टॉवरवरून उडी मारण्यासह त्याचे सर्व स्टंट स्वत: कोणत्याही बॉडी डमीच्या मदतीशिवाय केले आहेत.

हा चित्रपट हॉलिवूडपासून प्रेरीत 
‘मोहरा’ चित्रपटाची कथा ‘हार्ड बॉइल्ड’ आणि ‘डेथ विश 4: द क्रॅकडाउन’ या दोन हॉलिवूड सिनेमांपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचे ॲक्शन सीनसुध्दा या हॉलिवूड चित्रपटांपासून प्रेरीत झाला आहे.

102 डिग्री तापामध्ये शॉट करण्यात आला
या चित्रपटातील टिप टिप बरसा पानी हे गाणे लोकांना खूप आवडले, पण फार कमी लोकांना माहीत असेल की, अभिनेत्रीने हे गाणे 102 डिग्री तापात शूट केले होते. रवीनाने स्वतः इंडिया बेस्ट डान्सर शोमध्ये सांगितले होते की, तिला या गाण्याच्या वेळी इंजेक्शन घ्यावे लागले. पावसामुळे ती आजारी पडली. तरीही या चित्रपटामधील हा सीन आणि गाणे पूर्ण चित्रीत करण्यात आले.

Web Title: 30 years after the film mohra akshay kumar performed dangerous stunts without a body dummy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी
1

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक
2

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ ट्रेलरची बदलली रिलीज डेट; आता निर्माते या दिवशी दाखवणार चित्रपटाची झलक

Raveena Tandon च्या लेकीचे साऊथ चित्रपटात पदार्पण, दाक्षिणात्य इंडस्ट्री निवडण्यामागचं कारण काय?
3

Raveena Tandon च्या लेकीचे साऊथ चित्रपटात पदार्पण, दाक्षिणात्य इंडस्ट्री निवडण्यामागचं कारण काय?

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द
4

एकता कपूरच्या ‘या’ कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं, ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ची जिंकलेली रक्कम ‘या’ अभिनेत्याकडे केली सुपूर्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.