
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपट निर्माता आमिर खान हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. परंतु, त्याचे वैयक्तिक आयुष्य त्याच्या व्यावसायिक कामापेक्षा जास्त चर्चेचा विषय आहे. सर्वांना माहिती आहे की, त्याचे त्याच्या एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्याशी एक मजबूत नाते आहे. त्याचे रीना दत्ता यांच्याशी १६ व्या वर्षी लग्न झाले आणि किरण राव यांच्याशीही त्यांनी नंतर लग्न केले. २०२१ मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. आता, वयाच्या ६० व्या वर्षी, त्याला गौरी स्प्राटशी प्रेम झाल्याचे सांगितले आहे, ज्याबद्दल अभिनेत्याने स्वतःच एका कार्यक्रमात सांगितले आहे.
‘आम्ही वेगळे झालो, पण मनाने नाही’
मुलाखतीत बोलताना आमिर म्हणाला, ‘रीना एक जबरदस्त व्यक्ती आहे. आम्ही पती-पत्नी म्हणून वेगळे झालो, पण माणूस म्हणून नाही. तिच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आणि आदर आहे. मी तिच्या सोबत मोठा झालोय.” तो पुढे म्हणाला, “हेच किरणबद्दलही लागू आहे. ती देखील एक उत्तम व्यक्ती आहे. आम्ही वैवाहिक नातं संपवलं, पण कुटुंब म्हणून अजूनही एकत्र आहोत. रीना, किरण, त्यांचे आई-वडील, माझे आई-वडील आम्ही सगळे आजही एकाच कुटुंबाचा भाग आहोत.”
अभिनेता पुढे म्हणाला, “मला वाटलं होतं की आता मला कधीच योग्य पार्टनर मिळणार नाही. पण गौरी माझ्या आयुष्यात आली आणि तिने खूप शांती, स्थिरता आणि आनंद दिला. ती खरोखरच उत्कृष्ट व्यक्ती आहे. माझी लग्नं टिकली नसली, तरी रीना, किरण आणि आता गौरी या तिघींनीही मला माणूस म्हणून खूप काही दिलं आहे.” असे अभिनेता म्हणताना दिसला आहे.
सावत्र आईने ईशा देओलसाठी उचलेलं मोठं पाऊल, धर्मेंद्र यांनी स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा
‘महाभारत प्रोजेक्ट’ वर अभिनेता करणार काम?
कामाबाबत बोलताना आमिरने त्याच्या जवळपास दशकापासून चर्चेत असलेल्या ‘महाभारत प्रोजेक्ट’वर मोठे अपडेट दिले. त्यांनी सांगितले की हे महाकाव्य पडद्यावर आणणं त्यांच्यासाठी फक्त एक चित्रपट बनवणं नाही, तर एक आध्यात्मिक आणि सर्जनशील प्रवास आहे. ‘गेम चेंजर्स विद कोमल नाहटा’मध्ये ते म्हणाले की प्रोजेक्टची प्राथमिक तयारी सुरू आहे आणि पुढील दोन महिन्यांत स्क्रिप्टिंगलाही सुरुवात होऊ शकते. या भव्य प्रोजेक्टला यज्ञ असे देखील अभिनेत्याने म्हटले आहे.