(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिषेक बच्चन बॉलीवूडमधील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडे, अभिनेता शूजित सरकारच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ‘केबीसी 16’ शोच्या स्टेजवर पोहोचला. चित्रपटाच्या प्रमोशनच्या संदर्भात अभिषेक त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये अनेक गोष्टी शेअर करताना दिसला. यादरम्यान, पिता-पुत्र जोडीने खूप मजा केली आणि चित्रपटाबद्दल बरेच काही शेअर केले, परंतु यादरम्यान अभिषेक आपली मुलगी आराध्याबद्दल बोलताना खूप भावूक झाला.
अभिषेक त्याच्या चित्रपटावर काय म्हणाला?
अभिषेकने सांगितले की, त्याचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट सिंगल वडिलांच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे. चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा अर्जुन सेन आहे, जो त्याच्या मुलीसोबतच्या नात्यातील अंतर हाताळतो. अभिषेक म्हणाला की अर्जुनचे पात्र पूर्णपणे त्याच्या मुलीला समर्पित आहे आणि तो त्याच्या मुलीला दिलेल्या वचनाशी जोडलेला आहे की तो नेहमी तिच्यासोबत असेल.’ असे अभिनेत्याने या चित्रपटाच्या पत्राबद्दल सांगितले.
कोणत्या कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलिवूड ? स्वत:च्याच चुका सांगत केला खुलासा
आराध्यावर काय म्हणाला अभिषेक?
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिषेकने त्याची मुलगी आराध्याबद्दलही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, ‘आराध्या माझी मुलगी आहे आणि शूजित दा यांनाही दोन मुली आहेत. आपण सगळे ‘मुलीचे बाबा’ आहोत. आम्ही ही भावना चांगल्या प्रकारे समजतो.’ यासोबतच अभिषेकने सांगितले की, चित्रपटातील त्याचे पात्र जसे आपल्या मुलीला काही वचन देते, त्याचप्रमाणे त्याला आराध्याच्या लग्नातही डान्स करायचे आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या अफवा जोरात असताना अभिषेकचे हे वक्तव्य समोर आले आहे. मात्र, या अफवांवर अद्याप अभिषेक किंवा अभिनेत्री ऐश्वर्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अमिताभ बच्चन यांनी अफवांना पूर्णविराम दिला
दरम्यान, 21 नोव्हेंबर रोजी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या अफवांचा उल्लेख करताना म्हटले होते की, जोपर्यंत एखादी गोष्ट खरी होत नाही तोपर्यंत ती खोटी समजली पाहिजे. अमिताभ यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे कारण एक प्रकारे याने अफवांना पूर्णविराम दिला आहे.
‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटावर प्रतिक्रिया
अभिषेक बच्चनचा ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेकशिवाय अहिल्या बमरू, बनिता संधू, जॉनी लीव्हर, पर्ल डे आणि पर्ल माने यांसारखे कलाकारही दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा विषय रंजक आहे असे अनेकांचे म्हणणे आहे, पण काही ठिकाणी तो थोडा संथ वाटू शकतो. चित्रपटामधील अभिनेत्याचे पात्र खूप आकर्षित आहे. जे पाहताना प्रेक्षकांना भावुक वाटू शकत.