Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बोलण्यासाठी खूप काही आहे पण…’ अभिषेक बच्चनने आगामी चित्रपट ‘आय वॉन्ट टू टॉक’चे नवीन पोस्ट केली शेअर!

ऐश्वर्या रायसोबतच्या मतभेदांच्या बातम्यांमुळे अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहे. त्याच्या प्रोफेशनल लाईफबाबतही एक अपडेट समोर आले आहे. अलीकडेच अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे टीझर रिलीज चाहत्यांसह शेअर केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 25, 2024 | 02:41 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अभिषेकचे नाव निम्रत कौरशीही जोडले जात आहे. पण आता आपण त्याच्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार यांनी त्यांच्या नवीन चित्रपट आय वॉन्ट टू टॉकसाठी हातमिळवणी केली आहे. अभिषेक बच्चनने या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अभिषेक बच्चनच्या लूकने. शूजित सरकार हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. त्याचे चित्रपट भावनांनी भरलेले असतात.

अभिषेकने पोस्टर शेअर करत एक दमदार कॅप्शन लिहिले आहे
पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनने पोस्टरमध्ये लांब कोटसारखे काहीतरी परिधान केलेला दिसत आहे. अभिनेत्याचे पोट दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे हावभाव आहेत. त्याच्या पोटावर शस्त्रक्रियेची खूण आहे. पोस्टर शेअर करताना अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘सांगण्यासारखं खूप काही आहे पण पण चित्रपट सगळं सांगून जाईल… असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ 22 नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे केले कौतुक
यानंतर चाहत्यांनी आणि मीडियाच्या लोकांनी अभिषेकच्या कच्च्या आणि अनफिल्टर फर्स्ट लूकवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. एकाने टिप्पणी केली, “फिल्टरशिवाय वास्तविक अभिनेता…लव यू सर.” दुसरा म्हणाला,”माझे तुमच्यावर लक्ष आहे” असे लिहून चाहत्यांनी या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पोस्टरचे कौतुक करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सोनाली बेंद्रे, झोया अख्तर आणि सिकंदर खेर यांचा देखील समावेश आहे. अनेक चाहत्यांनी असेही सांगितले की ते दिग्दर्शक-अभिनेताची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हे देखील वाचा – 1996 मध्ये गायले पहिलं गाणं, लाइव्ह इव्हेंटमध्ये झाले निधन, 26 वर्षे बॉलीवूडवर केले राज्य या गायकाचे गुगलने तयार केले डूडल!

आय वॉन्ट टू टॉक चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन याशिवाय पर्ल डे, अहिल्या बांबरू, जयंत कृपलानी, क्रिस्टिन गुडडार्ड आणि जॉनी लीव्हर यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा आणि थीम याबद्दल फारसे काही उघड झालेले नाही. अभिषेक बच्चन शेवटचा ‘घूमर’ या चित्रपटात दिसला होता.

Web Title: Abhishek bachchan shares first look poster from i want to talk in pot belly caption has an hint with aishwarya rai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • entertainment

संबंधित बातम्या

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
1

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ
2

‘शक्ती, धैर्य आणि तेजस्वीपणाचे प्रतीक…’ वरुण-लावण्याने जाहीर केले बाळाचे नाव, सांगितला अर्थ

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?
3

महात्मा गांधींच्या पणतीचा हॉलिवूडमध्ये डंका! दिसायला एकदम ग्लॅमरस, जाणून घ्या ‘ही’ आहे तरी कोण?

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ
4

Bigg Boss 19: ‘सगळ्यांचा पाळीव कुत्रा…’, अभिषेक बजाजने शहबाजवर केली टीका; कॅप्टन्सी टास्कचा रंगला खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.