
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या पॉडकास्टबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया म्हणाले, “देवाने माणसाला बनवले कारण त्याला गोष्टी आवडतात आणि माणसापेक्षा जास्त चांगला कथाकार कोण असेल? गोष्ट कधीच संपत नसते, प्रत्येक टप्प्यासोबत ती विकसित होत असते. या इंडस्ट्रीत अनेक दशकं काम केल्यानंतरही माझा प्रवास अजूनही सुरूच आहे, असं माला वाटतं. प्रत्येक नवा अनुभव येतो तेव्हा नवा शोध घेण्यासाठी नवं काही शेअर करण्यासारखं त्यात असतं. या पॉडकास्टच्या माध्यमातून मला माझ्या प्रवासातील केवळ आठवणीच नाही तर जीवनात नेहमीच काहीतरी नवीन शोधण्यासारखे, शिकण्यासारखे आणि सेलिब्रेट करण्यासारखे असते.. हा विश्वास शेअर करता आला. जे अनुभव, ज्या भूमिका अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात, त्यांना महत्त्व देणाऱ्या उपक्रमाचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे.” असे अभिनेते म्हणाले.
आपले मत मांडताना जेन एस लाइफच्या संस्थापिका मीनाक्षी मेनन म्हणाल्या, “कहानी अभी बाकी है.. या पॉडकास्टद्वारे ज्या ज्येष्ठ व्यक्तींकडे एवढे ज्ञान, प्रेम आणि प्रेरणादायी विचार आहे, त्यांच्या विलक्षण प्रवासाचा सन्मान करण्याचा आम्हाला मॅन मिळाला. टीकू तलसानिया यांना पहिले पाहुणे म्हणून तिथे बोलावण्याचा आम्हाला आनंद आहे. जीवन हे सतत चालत रहावे, कधीही न थांबता. धाडस करत रहावे असे आहे. ही वृत्ती अभिनेत्याच्या अनुभवांतून दिसून येते.”
‘कहानी अभी बाकी है…’ या नव्याकोऱ्या शोमध्ये नक्की अभिनेते टीकू तलसानिया यांना काय प्रश्न विचारले गेले आणि अभिनेत्याने त्यांचे काय अनुभव शेअर केले हे तुम्हाला शेमारु लाईफस्टाइलच्या युट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे. ही पॉडकास्ट मालिका विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद साधणार आहे. यातून त्यांचे समृद्ध अनुभव समोर येतील आणि ज्येष्ठांना आणखी जास्त आणि चांगले आयुष्य जगण्यास मदत करण्याचा जेन एस लाइफचे उद्दिष्ट असणार आहे. आता या शोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.