(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज – ड्रॅमॅटिक’ जिंकणारा पहिला भारतीय काल्पनिक चित्रपट ‘साबर बोंडं’चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रोहन परशुराम कानवडे लिखित आणि दिग्दर्शित ‘साबर बोंडं’ हा चित्रपट राणा दग्गुबती यांच्या प्रॉडक्शन स्टुडिओ स्पिरिट मीडियाद्वारे भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष पुरस्कार मिळाल्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पश्चिम भारतातील खडकाळ भूप्रदेशावर आधारित आहे. हा चित्रपट एका शहरवासी आनंदची कथा आहे जो वैयक्तिक नुकसान आणि कौटुंबिक दबावांना तोंड देतो आणि त्याच्या मूळ गावात १० दिवस शोक करतो. जिथे तो पुन्हा त्याचा बालपणीचा मित्र बाल्याला भेटतो. या चित्रपटात भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचे ज्युरीने केले कौतुक
सनडान्स चित्रपट महोत्सवातील ग्रँण्ड ज्युरी पुरस्कार मिळवल्याने या चित्रपटाने भारतीय सिनेमाचे ज्युरीने कौतुक केले. ज्युरींनी ‘साबर बोंडं’ हे एक उत्तम आधुनिक प्रेमकथा म्हणून वर्णन केले. ते म्हणाले, “या संवेदनशील चित्रपटाला पुरस्कार मिळणे हा एक सन्मान आहे. आम्ही रडलो, हसलो आणि आम्हालाही तेच मिळावे अशी आमची इच्छा होती. आज जगाला अशाच प्रकारच्या प्रेमाची गरज आहे. हा खरा दृष्टिकोन आपल्याला एका जिव्हाळ्याच्या भाषेत प्रवेश करण्यास अनुमती देतो. हे आपल्याला असे काहीतरी करण्याची संधी देते जे आपण सर्वांना समजते.” असे म्हणून त्यांनी आपले मत मांडले आहे.
‘साबर बोंड’ या चित्रटासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. या दिग्गज मंडळीच्या पाठिंब्याने हा चित्रपट आता भारतभर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपट क्षेत्रातील मातब्बर मंडळींनी ‘साबर बोंड’ चित्रपटासाठी कार्यकारी निर्मात्याची भूमिका साकारल्याने या चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित होते. ‘साबर बोंडं’ हा भारतीय सिनेसृष्टीतील एक अविस्मरणीय चित्रपट ठरला असून, या चित्रपटाने मराठी कथाकथन शैलीला जागतिक स्तरावर सन्मानित केले आहे.