(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर यांच्यासाठी यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. हे प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं लवकरच मुंबईच्या पाली हिल परिसरातील त्यांच्या नव्या आलिशान बंगल्यात वास्तव्याला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घराचे बांधकाम सुरू होते, आणि आता अखेर या घराचा गृहप्रवेश दिवाळीत होणार असल्याची माहिती या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.
या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर यांनी एक विशेष निवेदन प्रसिद्ध करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे,“दिवाळी म्हणजे कृतज्ञता आणि नवीन सुरुवात. आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश करत असताना, तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.” आलिया आणि रणबीर कपूरचे हे घर अनेक प्रकारे खास असेल.
मुंबईतील महागड्या घरांच्या यादीत रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे नवीन घर सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. पाली हिल परिसरात उभा असलेला हा सहा मजली बंगला सुमारे २५० कोटी रुपये किंमतीचा आहे असे सांगितले जाते.
‘तुला नाही वाटत का माझं लग्न व्हावं?’, ‘वेल डन आई’चित्रपटाचा भावनिक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबईतील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याचा बंगला ‘मन्नत’ आहे. ‘मन्नत’ बद्दल अनेकदा बातम्या आणि चर्चा रंगत असतात.या बंगल्याचे मूळ नाव ‘Villa Vienna’ होते, जे शाहरुख खानने २००१ साली खरेदी केले. बांद्रा येथील समुद्राकडे पाहणाऱ्या या सहा मजली बंगल्याची किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या आलिशान घरात ५ बेडरूम, जिम, लायब्ररी, खासगी थिएटर, स्विमिंग पूल तसेच एक भव्य टॅरेस यांसारख्या अनेक सोयीसुविधा आहेत.
Exclusive: ‘कमळी ही मोठी जबाबदारी, मेहनत करून प्रेक्षकांना जिंकायचंय’ – विजया बाबर
मुंबईच्या जुहू परिसरात असलेला हा दोन मजली बंगला अभिनेता अमिताभ बच्चन यांना प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भेट म्हणून दिला होता. आज या घराची किंमत सुमारे १२० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.तर दुसरीकडे अभिनेता सलमान खान मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, पण त्याचा पनवेलमधील फॉर्महाऊस नेहमीच चर्चेत असतो. हा फॉर्महाऊस जवळपास १५० एकर क्षेत्रात पसरलेला असून त्यामध्ये स्विमिंग पूल, जिम, अस्तबल आणि अनेक लक्झरी सुविधांचा समावेश आहे. या फॉर्महाऊसची किंमत सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. स्टार्सच्या आलिशान घरांच्या यादीत अक्षय कुमार, अजय देवगन आणि संजय दत्त यांची नावेही प्रमुख आहेत.ृ.