(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील तिचे आलिशान अपार्टमेंट विकले आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या मते, अभिनेत्रीने तिचे आलिशान निवासी अपार्टमेंट ५.३० कोटी रुपयांना विकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यवहार गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये नोंदणीकृत करण्यात आला होता. आता अभिनेत्रीला या करारातून किती कोटियांचा फायदा झाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
२०१८ मध्ये खरेदी केली हे अपार्टमेंट
अंधेरी वेस्टमधील रनवाल एलिगंट बाय लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये हे आलिशान अपार्टमेंट आहे. मलायका अरोराने विकलेल्या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १,३६९ चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया १,६४३ चौरस फूट आहे. या व्यवहारात एक कार पार्किंग स्पेस देखील समाविष्ट आहे. या करारात ३१.०८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट होते. मलायकाने मार्च २०१८ मध्ये ते ३.२६ कोटी रुपयांना खरेदी केले होते, ज्यामुळे त्याची किंमत सुमारे २.०४ कोटी रुपयांनी वाढली आहे.
अंधेरी पश्चिम हा मुंबईचा एक पॉश परिसर
अंधेरी पश्चिम हा मुंबईतील एक पॉश परिसर आहे. या भागात अनेक आलिशान घर आणि सुविधा उपलब्ध आहेत. हा परिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड, उपनगरीय रेल्वे आणि वर्सोवा-घाटकोपर मेट्रो कॉरिडॉरद्वारे अत्यंत जोडलेला आहे. तसेच येथे अनेक सेलिब्रेटींनीची आलिशान घरे आहेत. तसेच हा मोठे करार करून अभिनेत्रीला चांगलाच फायदा झाला आहे.
‘भिकाऱ्याच्या ताटातुनही जेवण परत घेत नाही…’, कुनिका आणि झीशानमध्ये जोरदार राडा
‘थामा’ मध्ये मलायकाचा डान्स नंबर वन
मलायकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती अनेकदा डान्स रिॲलिटी शोमध्ये जज म्हणून दिसते. अनेक चित्रपटांमधील तिचे डान्स नंबरही खूप हिट झाले आहेत. आता मलायकाचा डान्स नंबर आयुष्मान खुरानाच्या आगामी ‘थामा’ चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय, मलायकाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. ती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटो पोस्ट करताना दिसत असते.