Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लव्ह गेम्स’मधील बोल्ड सीन्सबद्दल पत्रलेखाने सांगितले धक्कादायक सत्य, म्हणाली “हे पुन्हा कधीच करणार नाही”

बॉलिवूड अभिनेत्री पत्रलेखाने 'लव्ह गेम्स'मध्ये बोल्ड सीन्स करण्याबद्दल एक खुलासा केला आहे, जो नक्कीच चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. अभिनेत्रीने नक्कीकाय खुलासा केला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: May 16, 2025 | 04:29 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री पत्रलेखाने तिच्या सिनेमॅटिक कारकिर्दीची सुरुवात ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता. यानंतर, अभिनेत्रीने २०१६ मध्ये विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘लव्ह गेम्स’ चित्रपटात काम केले, ज्यामध्ये तिने बोल्ड सीन्स केले. आता पत्रलेखाने चित्रपटात बोल्ड सीन्स करण्याबद्दल खुलासा केला आहे. तसेच ती आता बदलली आहे असेही सांगितले आहे. या चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली जाणून घेऊयात.

अभिनेता विजय राज यांना लैंगिक छळ प्रकरणी क्लिन चीट, क्रू मेंबरचे आरोप; वाचा सविस्तर

बोल्ड सीन्स करण्यामागील कारण
अलिकडेच अभिनेत्री पत्रलेखा बॉलिवूड बबलच्या मुलाखतीत दिसली. यादरम्यान, अभिनेत्रीला विचारण्यात आले की ती पुन्हा ‘लव्ह गेम्स’ चित्रपटासारखी बोल्ड भूमिका साकारेल का? यावर अभिनेत्री म्हणाली, नाही, मी पुन्हा असे करणार नाही. १० वर्षांपूर्वीची पत्रलेखा ही खूप वेगळी, खूप लहान मुलगी होती. तिच्यासाठी काम करत राहणे खूप महत्वाचे होते. कदाचित ती चिंतेने त्रस्त होती, तिला फक्त काम हवे होते. मला तेव्हा ते कळले नव्हते, पण मी कदाचित निराशेतून किंवा नैराश्यातून तो बोल्ड सीन केला असेल. परंतु मी पुन्हा तसे करणार नाही.’ असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

अभिनेत्री निर्णयासाठी स्वतःला दोष देत होती
पुढे संभाषणात, अभिनेत्री म्हणाली, ‘आता सध्याची पत्रलेखा हे करू शकत नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करते, चित्रपटात काहीही चुकीचे नव्हते. त्यांनी पटकथेत जे लिहिले होते ते मी केले, पण मी त्याला न्याय देऊ शकेन का? नाही. मी त्या चित्रपटासाठी योग्य व्यक्ती होती का? नाही. ते माझ्यावर अवलंबून होते. मी याबद्दल विचार करायला हवा होता आणि भीतीपोटी ते करायला नको होते कारण सत्य हे आहे की माझ्याकडे नोकरी नव्हती. म्हणून मी प्रामाणिकपणे त्या निर्णयासाठी स्वतःला दोष देत होते.’ असे अभिनेत्रीने सांगितले.

ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केल्याने कंगना रणौत अडचणीत , जेपी नड्डा यांच्या सूचनेवरून पोस्ट डिलिट; ट्रम्प यांच्याबद्दल काय लिहिल

पत्रलेखाची कारकीर्द
अभिनेत्री पत्रलेखाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती अलीकडेच ‘फुले’ चित्रपटात दिसली. हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. यापूर्वी ती अनुभव सिन्हा यांच्या ‘आयसी ८१४ कंधार हायजॅक’ या वेब सिरीजमध्ये एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसली होती. पत्रलेखाने तिच्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. आणि पुढे देखील ती अश्याच जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Actress patralekhaa reveals that she did bold role in love games due to anxiety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 04:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.