Kangana Ranaut says American President Donald Trump Jealous of PM Narendra Modi
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे. कंगना रणौत यांनी म्हटलं आहे की, ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना भारतात उत्पादन विस्ताराबद्दल केलेल्या सूचनेसंबंधी केलेली पोस्ट डिलीट करण्याची सूचना मला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली.
शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये कंगना म्हणते, ” आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला फोन केला आणि ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन करू नये असे सांगितलेले ट्विट डिलीट करण्यास सांगितले. माझे वैयक्तिक मत पोस्ट केल्याबद्दल मला वाईट वाटते, सूचनांनुसार मी ते इन्स्टाग्रामवरून लगेचच डिलीटही केले, धन्यवाद…” दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना राणौतने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी टीम कुक यांना केलेल्या सूचनेबद्दल एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने काही मुद्दे नमूद करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना केली होती.
Respected national president Shri @JPNadda ji called and asked me to delete the tweet I had posted regarding Trump asking Apple CEO Tim Cook not to manufacture in India.
I regret posting that very personal opinion of mine, as per instructions I immediately deleted it from…— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 15, 2025
अभिनेता विजय राज यांना लैंगिक छळ प्रकरणी क्लिन चीट, क्रू मेंबरचे आरोप; वाचा सविस्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत कंगना रणौत म्हणाली की, “या प्रेमाच्या नुकसानाचे कारण काय असू शकते? ट्रम्प हे जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचे नेते असले, तरी नरेंद्र मोदी हे जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. ट्रम्प राष्ट्रध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा आले आहेत, परंतु भारताचे पंतप्रधान हे तिसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. ट्रम्प अल्फा पुरुष आहेत यात काही शंका नाही, परंतु आमचे पंतप्रधान सब-अल्फा पुरुषांचे जनक आहेत. तुम्हाला काय वाटते? ही वैयक्तिक मत्सर आहे की राजनैतिक असुरक्षितता? ”
कान्सच्या रेड कार्पेटवर चमकणारी सर्वात तरुण भारतीय अभिनेत्री ठरली नितांशी गोयल, पाहा PHOTOS
कतारमधील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी म्हटलं होतं, “भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो, ते खूप चांगले काम करत आहेत.” त्यांनी हाही दावा केला की, “अॅपल आता अमेरिकेत आपले उत्पादन वाढवणार आहे, हे त्यांनी कुकसोबत केलेल्या चर्चेमुळे झालं आहे.” अॅपल कंपनी सध्या अमेरिकेत आयफोन तयार करत नाही. मात्र पुढील वर्षाच्या अखेरीस अमेरिकेतील आयफोन पुरवठ्याचा मोठा हिस्सा भारतात तयार व्हावा, असा कंपनीचा उद्देश आहे, जेणेकरून चीनवरील अवलंबित्व कमी होईल.