Actor Vijay Raaz Acquitted In Sexual Harassment Case Sherni Film Set
बॉलिवूड अभिनेते विजय राज यांना विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांमध्ये आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यांनी ‘भूल भुल्लैया ३’, ‘गली बॉय’, ‘स्त्री’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘डेढ इश्किया’, ‘डेल्ही बेली’ यांसारख्या सुपर डुपरहिट चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चर्चेत राहणारे विजय राज सध्या त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या शुटिंग वेळी सेटवर एका महिला क्रू मेंबरने विजय राज यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, आता त्या आरोपांमधून अभिनेत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर चमकणारी सर्वात तरुण भारतीय अभिनेत्री ठरली नितांशी गोयल, पाहा PHOTOS
२०२१ साली रिलीज झालेल्या विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी एका महिला क्रू मेंबरने अभिनेता विजय राजवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. २०२० साली शुटिंग दरम्यान सेटवरील एका महिला क्रू मेंबरने अभिनेत्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा आरोप केला होता. तथापि, आता सुमारे ४ वर्षांनंतर, मुंबईच्या गोंदिया दंडाधिकारी न्यायालयाने खटल्यानंतर त्याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे आणि त्याच्यावरील सर्व आरोप देखील फेटाळून लावले आहेत. गोंदिया दंडाधिकारी न्यायालयाकडून अभिनेत्यावरील सर्व आरोप रद्द करण्यात आले आहेत.
विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…
लोकप्रिय सेलिब्रिटी वकिल सवीना बेदी सच्चर हे विजय राजच्या वतीने केस लढत होते. वकिल सवीना बेदी सच्चर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेता विजय राज ‘शेरनी’ चित्रपटाची शुटिंग नागपुर शहरानजीक करत होते. त्या दरम्यानच अभिनेत्यावर केस दाखल करण्यात आली होती. अभिनेत्यावर केस दाखल झाल्यानंतरच विजय राज यांना चित्रपटाची शुटिंगच अर्ध्यावर सोडावी लागली होती, इतकंच नाही तर त्यानंतर विजय यांना अनेक चित्रपटही सोडावे लागले होते. पण आता ते निर्दोष असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. आरोप लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला दोषी ठरवणाऱ्या लोकांसाठी हे एक उदाहरण ठरेल, अशी आशा आहे.”
समांथा प्रभूचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट…
संपूर्ण प्रकरण काय होते?
अभिनेता विजय राज याला ४ नोव्हेंबर २०२० रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट येथून अटक करण्यात आली होती. ‘शेरनी’ चित्रपटातील एक महिला क्रू मेंबर त्याच्यासोबत हॉटेलमध्ये थांबली होती. तिथे तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. पण त्याच दिवशी अभिनेत्याची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की, विजय राजने तिच्या लूकवरुन टिप्पणी करण्यात आली होती. शिवाय, तिच्या संमतीशिवाय तिचा मास्क बदलण्याचा प्रयत्न केला. महिलेने सुरुवातीला आक्षेप घेत वरिष्ठांना या घटनेबद्दल सांगितलं. नंतर तिने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता जवळपास साडेचार वर्षांनंतर या प्रकरणी गोंदिया कोर्टाने निर्णय दिला असून विजय राज यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.