
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री राधिका आपटेने गेल्या वर्षा एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या ती तिच्या लेकीच्या पालनपोषण करण्यात व्यग्र आहे.राधिका आपटेला हिंसाचाराच्या वातावरणात आपल्या मुलाला वाढवण्याची भीती वाटते. भारतीय चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वर्चस्व गाजवणाऱ्या हिंसक कंटेंटबद्दल अभिनेत्रीने उघडपणे बोलले आहे. द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना, अभिनेत्री म्हणाली की मनोरंजन म्हणून सादर केली जाणारी हिंसाचाराची लाट तिला खूप त्रासदायक आहे. आई झाल्यानंतर ती अलीकडेच कामावरून ब्रेकवर होती.
राधिका आपटे म्हणाली, “मी खूप थकले आहे आणि मला हे उघडपणे सांगावेच लागेल… मनोरंजनाच्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या हिंसाचारामुळे मला खूप वाईट वाटते. माझे मूल अशा जगात वाढावे असे मला वाटत नाही जिथे हे मनोरंजन आहे. मी ते सहन करू शकत नाही.” तिने आज पडद्यावर दाखवण्यात आलेली क्रूरता “खूपच अस्वस्थ करणारी” असल्याचेही म्हटले.
तिने असा युक्तिवाद केला की चित्रपट निर्माते अनावश्यकपणे त्यांच्या मर्यादा ओलांडत आहेत आणि कथाकथनाचे साधन म्हणून भयानक दृश्यांचा वापर करत आहेत. राधिका म्हणाली, “फिल्ममेकर उगाचच मर्यादा पार करत आहेत आणि भयावह सीनच्या माध्यमातून कथा सांगत आहेत. जर मला कोणाच्या क्रूर कृत्यांची कथा सांगायची असेल, तर मला ती दृश्ये पाहण्याची गरज नाही. ही गोष्ट सांगणे होत नाही. मी कधीच असे काही पाहिले नाही. समाजावर याचा मोठा परिणाम होतो आणि याच गोष्टी विकल्या जात आहेत, याचं मला दु:ख होतं.”
Street Fighter Teaser: ‘स्ट्रीट फाइटर’ चित्रपटाचा टीझर आउट, Vidyut Jammwalचा जबरदस्त लुक होतोय व्हायरल
राधिका आपटे ‘साली मोहब्बत’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, जो १२ डिसेंबर २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. टिस्का चोप्रा अभिनीत या चित्रपटाला यापूर्वीच अनेक ठिकाणी प्रशंसा मिळाली आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) आणि शिकागो दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव यांचा समावेश आहे.