(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर माहीका शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर आणि मनोरंजनाच्या बातम्यांमध्ये सध्या दोघांच्या रिलेशनशिपच्या अफवा जोमात आहेत.हार्दिकने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तो माहीकासोबत दिसत होता.आता याच पार्श्वभूमीवर माहीकाने देखील एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये ती आणि हार्दिक एकमेकांचा हात धरून उभे असल्याचं दिसतंय.सध्या माहीका मालदिव्समध्ये तिचा बर्थडे हार्दिकसोबत सेलिब्रेट करत आहे, आणि या रोमँटिक वेकेशनमधून ती सतत सोशल मीडियावर प्रेमळ फोटो शेअर करत आहे.या कोजी फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो पाहताच चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणं सुरू केलं आहे. अनेकांनी या दोघांना एक “Cute Couple” असं म्हटलं असून काही जण विचारत आहेत, “ही फक्त मैत्री आहे का? की काहीतरी अधिक?”
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
यादरम्यान माहिकाने लवकरच खुशखबर देणार असल्याचे सांगितले. खरतर माहिका शर्माने यंदा दिल्लीत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली आहे. अशात तिच्या फ्रेंड्सनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलं की, या सीझनमध्ये मला तुझी खूप आठवण आली, पण या घोषणेसाठी नेहमीच वाट पाहिली. ही पोस्ट रिशेअर करत माहिका शर्माने लिहिले की, ”उफ्फ, किती प्रेम… लवकरच तुमच्या सर्वांची भेट होईल. विश्वास ठेवा ही प्रतीक्षा वाया जाणार नाही”
प्रेक्षकांच्या नजरेतून काहीच सुटत नाही, ‘कांतारा चॅप्टर 1’मधील चूक सोशल मीडियावर झाली व्हायरल
मॉडेल माहीका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे. माहीकाने नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.दोन फोटोंमध्ये माहीकाने पिवळ्या रंगाचा ग्लॅमरस ड्रेस घातला आहे. याशिवाय तिने आपल्या फूड प्लेट्सचेही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून ती सध्या रिलॅक्स आणि रोमँटिक मूडमध्ये असल्याचं जाणवतं.सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, एका कोलाज फोटोत माहीका हार्दिक पांड्याचा हात धरलेला स्पष्ट दिसतो!हा फोटो पाहताच चाहत्यांमध्ये पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.
Bobby Deol New Movie: “पॉपकॉर्न घेऊन या..”, बॉबी देओलचा ‘प्रोफेसर’ लूक, नव्या चित्रपटाचे पोस्टर तुफान व्हायरल
नताशा सोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिकच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही काळ हार्दिकचं नाव ब्रिटिश-इंडियन सिंगर जैस्मीन वालियासोबतही जोडलं गेलं होतं. मात्र या अफवांवर हार्दिक किंवा जैस्मीनने कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.परंतु आता हार्दिकचं नाव मॉडेल आणि फिटनेस क्रिएटर माहीका शर्मासोबत जोडलं जातंय आणि ते सिरियस रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये आहे.