(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या ‘द बैड्स ऑफ बॉलिवूड’ च्या यशाचा आनंद लुटत आहेत. या सिरीजमधील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे.आता बॉबीने आपल्या चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. त्यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करत सर्वांनाच उत्साही केलं आहे. अभिनेता बॉबी देओलने आपल्या आगामी प्रोजेक्टचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये बॉबी एका जबरदस्त आणि गूढ लूकमध्ये दिसत असून, त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “पॉपकॉर्न घेऊन या, शो सुरू होणार आहे… १९ऑक्टोबरला आग लावू!” या पोस्टरमध्ये बॉबी देओल ‘प्रोफेसर व्हाइट नॉइज’ या पात्रात दिसणार असल्याचं स्पष्ट होतं.या घोषणेमुळे बॉबीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच्या या नव्या भूमिकेतील लूकवरून असं वाटतंय की, बॉबी पुन्हा एकदा गूढ आणि खलनायकाच्या अवतारात झळकणार आहे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने एक्स पतीच्या वाढदिवशी केली खास पोस्ट, म्हणाली…
या नवीन पोस्टरमध्ये बॉबीने ट्वीड जॅकेट, डार्क फ्रेम असलेला चष्मा परिधान केला असून त्याच्या सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये, लांब केसांची स्टाईल आणि चेहऱ्यावरचं गूढ हसू लक्ष वेधून घेतंय.बॉबी देओल यंदा त्याच्या चाहत्यांसाठी एका हून एक मोठे चित्रपट घेऊन येत आहे. वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच ख्रिसमस 2025 साठी, त्यांची बहुप्रतिक्षित मोठी फिल्म ‘अल्फा’ रिलीज होणार आहे.या चित्रपटात बॉबी देओल पुन्हा एकदा विलनच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्याने याआधी ‘वॉर 2’ मध्ये एक छोटं पण लक्षवेधी कॅमियो केलं होतं, ज्यामध्ये त्याच्या सोबत एक लहान मुलगी देखील दिसली होती. ज्यामुळे त्याच्या पात्राभोवती आणखी गूढता निर्माण झाली.‘अल्फा’ मध्ये बॉबीसोबत आलिया भट्ट, शरवरी वाघ, आणि अनिल कपूर हे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट YRF च्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
“रातभर झोपलो नाही…”21 वर्षांच्या अशनूरला सलमान खाननं खडसावलं, आई-वडील झाले भावूक
सध्या बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी एकापेक्षा एक धमाकेदार अपडेट्स येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, बॉबी देओल लवकरच रणवीर सिंगसोबत एका नव्या चित्रपटात झळकणार आहेत.आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आहे!
बॉबी देओलचा नवा प्रोजेक्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्साह इतका वाढलाय की, त्यांनी आत्ताच त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे. आणि रिलीजसाठी अजून काही दिवस बाकी आहेत. हा प्रोजेक्ट १९ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे