मुंज्याच्या अफाट यशानंतर आदित्य सातपोदार आणि दिनेश विजन आणखी एक धमाका घडवणार आहेत. निर्माते आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाचे शीर्षक ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पाहायला मिळणार आहे. मुंज्या सारखा आता हा चित्रपट देखील जोडला जाईल आणि दिनेश विजनच्या हॉरर कॉमेडी विश्वाचा एक भाग असणार आहे. दिनेश विजन यांना आता या क्षेत्राचा मास्टर म्हणता येईल. कारण त्याने 2018 साली ‘स्त्री’मधून सुरुवात केली. यानंतर तो ‘भेडिया’ आणि मग ‘मुंज्या’ घेऊन प्रेक्षकांच्या समोर आला.
चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार?
पिंकविलाच्या वृत्तानुसार, दिनेश विजानने आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांना मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. चित्रपटाची हि कथा व्हॅम्पायर्सवर आधारित असेल. आयुष्मान खुराना आणि दिनेश विजान यांनी यापूर्वी बाला या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती आणि आता निर्माते या वर्षाच्या अखेरीस तो फ्लोअरवर घेण्याची तयारी करत आहेत.
ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार
या चित्रपटाची स्क्रिप्ट सध्या लिहिली जात असून लवकरच त्याच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आणि याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
Vampires ऑफ विजय नगर या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी, आयुष्मान खुराना करण जोहरच्या अनटायटल स्पाय थ्रिलर आणि अनुराग सिंगच्या बॉर्डर 2 चे शूटिंग पूर्ण करणार असल्याचे समजले आहे. दरम्यान, रश्मिका मंदान्ना अल्लू अर्जुनसोबत पुष्पा २ चे शूटिंग पूर्ण करणार आहे. पुष्पा 2 ची रिलीज डेट आधी 15 ऑगस्ट 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.